उंबर्डे गावातील बहीण- भाऊ डॉक्टरकिच्या शिक्षणासाठी जाणार युक्रेनला…

धनगर समाजाच्या वतीने अभिनंदन करत पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा…

वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे गावचे कुमारी आसावरी पांडुरंग काळे व कुमार दिपराज पांडुरंग काळे ही दोन्ही बहीण भाऊ उच्च शिक्षणासाठी (MBBS) डॉक्टरकीसाठी युक्रेन युरोप येथे जाता असून त्याचे वैभववाडी तालुक्यातील धनगर समाजाने अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रभाकर कोकरे, दशरथ,शिंगाडे, सत्यवान शेळके,शंकर कोकरे, संजय शेळके, जयेश शेळके, आदी समाज बांधव उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष कथा शिक्षक नेते पांडुरंग काळे व माधवराव पवार विद्यालयाच्या शिक्षिका सौ पल्लवी काळे,हे आपले दोन्ही मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवत असल्याने त्यांचं व मुलांचं सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

You cannot copy content of this page