नाधवडे येथे आंबा पिक शेतीशाळा संपन्न…

वैभववाडी प्रतिनिधी कृषि विभाग वैभववाडी यांच्या मार्फत नाधवडे सरदारवाडी येथे आंबा पिकाच्या शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित आंबा बागायतदार शेतकऱ्यांना प्रा.श्री.निखिल फुटणकर, (कृषि महाविद्यालय, सांगुळवाडी) यांनी आंबा पिकाची लागवड, एकात्मिक खत व्यवस्थापन, किड,-रोगांची ओळख व त्यांचे नियंत्रण याबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी एस.एस.कांबळे व कृषीपर्यवेक्षक ए.आर.पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व नियोजन कृषी सहाय्यक श्रीमती.एन.एस. पावडे यांनी केले.

You cannot copy content of this page