Global Maharashtra Breaking News

राणेवर गुन्हा दाखल करा…गुन्हे दाखल न झाल्यास जन आशीर्वाद यात्रा रोखणार…!

कणकवली तालुका शिवसेनेच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन *⚡कणकवली ता.२४-:* महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बदनामीकारक व शिवसैनिकांच्या भावना दुखवणारी व्यक्तव्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जन आशीर्वाद यात्रे दरम्यान करीत आहेत. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यच्या संदर्भात नारायण राणे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत व भारतीय दंड विधान अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, हे…

Read More

कळसुलकर हायस्कूलचे एन्. एम्. एम्. एस्. परीक्षेत यश

*⚡सावंतवाडी ता.२४-:* सन २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या एन्. एम्. एम्. एस्. (राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागास शिष्यवृत्ती परीक्षा) परीक्षेत कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी येथील इयत्ता आठवी मधील कुमार पार्थ राजेश वाडकर हा खुल्या प्रवर्गातून गुणवत्ता यादीमध्ये सहावा आला आहे. या परीक्षेत कुमार पार्थ राजेश वाडकर, कुमार यश गणपत कदम या दोन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. दोन्ही विद्यार्थी…

Read More

मळगाव येथील दोन दिवसीय वार्षिक हरिनाम सप्ताहाची महाप्रसादाने सांगता

मळगाव येथील स्थानिक भजन मंडळांची भजने सादर *⚡सावंतवाडी ता.२४सहदेव राऊळ-:* मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथाचा सातपाराचा वार्षिक हरिनाम सप्ताह उत्साहात पार पडला. मळगाव येथील स्थानिक भजन मंडळांनी ठरवून दिलेल्या पाराप्रमाणे आपली भजने सादर केली. या दोन दिवसीय हरिनाम सप्ताहाची सोमवारी महाप्रसादाने सांगता करण्यात आली. मळगावातील भाविकांनी हरिनाम सप्ताहाचा लाभ घेतला. रविवार सकाळपासून हरिनाम सप्ताहास…

Read More

पाडलोसमध्ये लसीकरणाचा टक्का वाढला

*⚡बांदा दि२४-:* संभाव्य तिसऱ्या लाटेपासून स्वतःसह गावाचे संरक्षण करण्यासाठी पाडलोसमध्ये नुकत्याच झालेल्या कोवीशिल्ड कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळाला. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या माध्यमातून मिळालेल्या डोसमुळे पाडलोस गावातील लसीकरणाचा टक्का वाढत असून नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतमध्ये झालेल्या लसीकरणावेळी पोलिस पाटील रश्मी माधव, आरोग्यसेविका एस.रंगसूर, समुदाय आरोग्य अधिकारी टी.आर.माजगावकर, आशासेविका कविता…

Read More

मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, राणेंना अटक होणार का?

पोलिसांचे पथक रवाना *⚡मुंबई दि.२४-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले आहे. नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांचे एक पथक चिपळूणला रवाना झाले आहे. शिवसेनेचे नाशिकमधील शहाराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

Read More

सावंतवाडीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे स्वागत संजू परब कशा प्रकारे करणार…?

न. प. निवडणूक तोंडावर आल्याने सर्वांचे लक्ष सावंतवाडीतील स्वागतावर *⚡सावंतवाडी ता.२३-:* केंद्रीय मंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा जन आशीर्वाद यात्रेस २६ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यात नारायण राणे यांचे जंगी स्वागत करण्याचा निर्णय त्या त्या तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचे केंद्रबिंदू असलेल्या सावंतवाडी शहरात सावंतवाडी…

Read More

कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यायात श्लोक पठण स्पर्धा संपन्न

मुलांमध्ये पाठांतराची आवड निर्माण व्हावी या हेतूने संस्कृत दिनाचे औचित्य साधून आयोजन *⚡सावंतवाडी ता.२३-:* सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, सावंतवाडी संचलित प्राथमिक शाळा कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीच्यावतीने संस्कृत दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत विषयाची तसेच पाठांतराची आवड निर्माण व्हावी या हेतूने गणपती स्तोत्र, शुभंकरोती, रामरक्षा, अथर्वशीर्ष, भगवदगीता यांचे श्लोक पाठांतर व्हिडिओ स्वरूपात…

Read More

केंद्रीय उद्योगमंत्री नाम.नारायण राणे यांचा सिंधुदुर्गातील जनआशीर्वाद यात्रा दौरा जाहीर

*⚡कणकवली ता.२३-:* सिंधुदुर्गवासियांना उत्सुकता लागून असलेल्या केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेची रुपरेषा जाहिर करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग दौरा पुढीलप्रमाणे असेल. २५ ऑगस्टला दुपारी ४ वाजता खारेपाटण येथे स्वागत. ४.४५ वाजता तळेरे येथे स्वागत. त्यानंतर सायंकाळी ५.३० वा. वैभववाडी येथे स्वागत आणि आत्मनिर्भर लाभार्थी भेट कार्यक्रम, सायं. ६.३० वाजता फोंडाघाट…

Read More

कोकण गांधींच्या स्वच्छतेचा वारसा जपणाऱ्या स्वच्छता दूतांनी घेतला व्यसनमुक्तीचा संकल्प

*⚡कणकवली ता.२३-:* रक्षाबंधनच्या निमित्ताने नशाबंदी मंडळ शाखा सिंधुदुर्ग आणि नगरपंचायत कणकवली, हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र, समृद्धी वस्ती स्तर संघ टेंब वाडी कणकवली यांच्या संयुक्तपणे व्यसनमुक्ती शी बंधन|| व्यसनांपासून रक्षण||।हा अनोखा कार्यक्रम कणकवली नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल भोगले, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत,…

Read More

भाजप महिला मोर्चाकडून पोलिस आणि वन अधिकाऱ्यांना रक्षाबंधन

*⚡सावंतवाडी ता.२३-:* भाजप महिला मोर्चाच्या माध्यमातून सावंतवाडी पोलिस स्टेशन आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला आहे. सावंतवाडी भाजप महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. तसेच या माध्यमातून झाडे लावणे व ती जगवणे किती महत्त्वाचे आहे. हे पटवून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी सरचिटणीस मेघना साळगावकर,…

Read More
You cannot copy content of this page