ऑनलाईल वक्तृत्व स्पर्धेत गौरव आजगांवकरचे यश

*⚡वेंगुर्ला ता.१५-:* भारताचे राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या ६व्या स्मृतिदिनानिमित्ताने ‘व्हिजन २०२०च्या पलिकडे‘ यावर घेण्यात आलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत वेंगुर्ला शाळा नं.२मधील इयत्ता सहावीतील विद्यार्थी गौरव दत्तप्रसाद आजगांवकर याने घवघवीत यश संपादन केले आहे.

त्याला डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन रामेश्वरम-तामिळनाडू येथील ‘कलाम हाऊस‘कडून सुवर्णपदक व ग्रेड प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

कु. गौरव याला शिक्षक कपुर्रगौर जाधव, कोळंबकर तसेच आई व वडील यांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page