होप एक्सप्रेसला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

*⚡वेंगुर्ला ता.१५-:* रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० गव्हर्नर रोटरीयन गौरीश धोंड यांच्या नेतृत्वाखाली, डिस्ट्रिक्ट कम्युनिटी सव्र्हिस सेक्रेटरी डॉ. लेनि डिसेजा , डिस्ट्रिक्ट कोऑर्डीनेटर सचिन मेणसे, कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉ.प्रमोद माने यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग-गोवा भागातील लोकांसाठी मोफत होप एक्सप्रेस कॅन्सर डिटेक्शन कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. वेंगुर्ल्यातील या मोफत सेवेचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते १२ डिसेंबर रोजी बॅ. खर्डेकर कॉलेज येथे झाले.

वेंगुर्ल्यातील बहुसंख्य जनतेने या तपासणीचा लाभ घेतला. यावेळी कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या डॉ.वैशाली शिरोडकर, सिंधुदुर्ग रोटरी असिस्टंटगव्हर्नर राजेश घाटवळ, वेंगुर्ला मिडटाऊन प्रसिडेंट प्रा.सदाशिव भेंडवडे, वेंगुर्ला इनरव्हीलच्या डॉ.पुजा कर्पे, सेक्रेटरी सुरेंद्र चव्हाण, ट्रेझरर नितीन कुलकर्णी, संजय पुनाळेकर, प्रा.आनंद बांदेकर, प्रा.वसंत पाटोळे, सुनिल रेडकर, पंकज शिरसाट, नगरसेवक विधाता सावंत, इनरव्हील पास्ट प्रेसिडेंटगौरी मराठे, साहिली निनावे, प्रितेश लाड, सर्जिल कर्जिकर, अनिकेत निब्रे, सलोनी मजिठिया, रागिणी मौर्य, रोटरॅक्ट क्लब व होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज टिम, कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे मॅमो टेक्निशियन शितल गावडे, बाळकृष्ण पाटील, एलिना कार्डोज, सोबिना लोबो, सुनिल शिंदे आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page