ओसरगाव पटेलवाडी येथील दिवाकर सावंत -डोंगरे यांची शाळेला 10 हजार रुपयांची देणगी

*⚡कणकवली ता.१५-:* ओसरगाव शाळा नंबर 1 शतक महोत्सव कार्यक्रमानिमित्त आरोग्य शिबिर कार्यक्रमाप्रसंगी ओसरगाव पटेलवाडी येथील रहिवासी व माजी विद्यार्थी दिवाकर सावंत -डोंगरे यांनी शाळेला दहा हजार रुपयांची देणगी सुपूर्द केली. याप्रसंगी महोत्सवाचे अध्यक्ष ॲड.विलास परब,ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे व माजी विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.

दिवाकर सावंत हे 1970 ते 72 या कालावधीत प्रशालेत शिक्षण घेत होते .आजही त्यांनी आपले शाळेवर प्रेम कायम असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले. ते सेवानिवृत्त पोस्ट कर्मचारी आहेत. त्यांच्या या दानशूरमुळे ओसरगाव ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

You cannot copy content of this page