Global Maharashtra Breaking News

नारायण राणेंना जामीन;वेंगुर्लेत जल्लोष

भाजपा कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंद *⚡वेंगुर्ले ता.२५-:* केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांना महाड कोर्टाने जामीन मंजूर झाल्यावर आज सकाळी वेंगुर्ले भाजपा च्या वतीने तालुका कार्यालयाच्या बाहेर जल्लोष करण्यात आला. यावेळी राणे साहेबांचा विजय असो , भारतीय जनता पार्टीचा विजय असो , आघाडी सरकारचा निषेध असो , ठाकरे सरकार हाय हाय , राणे साहेब आगे…

Read More

मळगाव इंग्लिश स्कुलमधील दहा मुलींना सायकल

माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांचा पुढाकार *⚡सावंतवाडी ता.२५-:* माजी केंद्रीय मंत्री खा. सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नाने जन शिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्यावतीने गोवा विमानतळ प्राधिकरण सीएसआर निधीतून मळगांव इंग्लिश स्कूल या प्रशालेमधील दहा गरजू होतकरू विद्यार्थिनींना मान्यवरांच्या उपस्थितीत सायकलचे वितरण करण्यात आले. यावेळी जन शिक्षण संस्थानच्यावतीने भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सदस्य चंद्रकांत जाधव यांनी जन…

Read More

मालवणात भाजपा आक्रमक सामनाची केली होळी

जशात तसे उत्तर देण्याचा चिंदरकर यांचा इशारा मालवण दि प्रतिनिधी शिवसेना हाय हाय, उद्धव ठाकरे हाय हाय… नारायण राणे अंगार है, बाकी सब भंगार है… नारायण राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा देत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक व सुटकेच्या पार्श्वभूमीवर आक्रमक बनलेल्या मालवणातील भाजप कार्यकर्त्यानी आज सामना वृत्तपत्राची होळी…

Read More

नारायण राणेंच्या अटकेचा भावनिक बाजार केला जातोय

सेनेच्या जयेंद्र परुळेकर यांचा भाजपवर आरोप *⚡सावंतवाडी ता.२५-:* महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल अशोभनीय वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. परंतु, भाजपकडून आता त्याचा भावनिक बाजार मांडला जात असल्याचा आरोप नगरसेवक जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

Read More

स्वतंत्र कोकण राज्य हा आमचा जन्मसिध्द हक्क: प्रा . महेंद्र नाटेकर

*⚡कणकवली ता.२५-:* स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना लोकमान्य टिळकांनी करुन जनजागरण केले आणि त्यांच्याच प्रेरणेमुळे १५ ऑगस्ट १ ९ ४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले . त्यानंतर तामिळनाडू , केरळ , गोवा ही सागरी राज्ये झालेच नाही . पण कोकणचे सागरी राज्य झालेच नाही. राज्य निर्मितीचे नियम धाब्यावर बसवून…

Read More

ठाकरे सरकार बिथरले म्हणून सूड बुद्धीने राणेंवर कारवाई:राजन तेली

रिशेड्युल होताच जनआशीर्वाद यात्रा उत्सवाप्रमाणे यात्रा निघणार *⚡कणकवली ता.२५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु होणार होती.मात्र काल घडलेल्या घेतनेमुळे ही यात्रा पुढे ढकळलेली आहे.ही यात्रा भाजपा प्रदेश कार्यालयाकडून लवकरच रिशेड्युल येणार आहे.पहिल्यादाच केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असल्याने उत्सव,सण असावा अशी तयारी कार्यकर्त्यांनी केली होती.मात्र,ठाकरे सरकार बिथरले म्हणून…

Read More

चतुर्थी पूर्वी रस्त्यातील खड्डे बुजवा

अन्यथा भीक मांगो आंदोलन;मनसेचा इशारा *⚡सावंतवाडी ता.२५-:* सावंतवाडी तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था झाली असून, तोक्ते चक्रीवादळा नंतर अनेक ठिकाणी रस्त्यावरील धोकादायक झाडेझुडपे अजूनही तोडण्यात आली नाहीत. गणेश उत्सव जवळ येत असताना देखील तालुक्यात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे चतुर्थीपूर्वी सर्वे खड्डे न बुजवल्यास सावंतवाडी तालुका मनसे तर्फे भिक मांगो आंदोलन करण्यात येईल. असा इशारा कार्यकारी…

Read More

श्री गांगेश्वर पावणाईदेवी ग्रामस्थ मंडळ नडगीवेतर्फे उमरठ पूरग्रस्तांना आर्थिक मदत

*⚡कणकवली ता.२५-:* कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावातील श्री गांगेश्वर पावणाईदेवी ग्रामस्थ मंडळ मुंबई.नडगिवे या मंडळाच्या वतीने नुकत्याच मुक्काम गाव – उमरठ ता.पोलादपूर,जि.रायगड येथील पूरग्रस्त बांधवांना सुमारे ५१०००/- रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात पूर आला होता.यामुळे अनेकांचे संसार उघडयावर पडले होते. तर काही लोक मृत्यूमुखी पडले होते. याची दखल घेऊन कणकवली तालुक्यातील…

Read More

नारायण राणेंना जामीन झाल्याने आचरा येथे भाजपचा जल्लोष

*⚡मालवण ता .२५-:* मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड न्यायालयाने मंगळवारी रात्री उशिरा जामीन मंजूर केला. यामुळे राणे समर्थक व भाजप कार्यकर्ते यांनी मध्यरात्री ठिकठिकाणी जल्लोष केला. आचरा येथे भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जि. प. सदस्य जेरोन फर्नांडिस, संतोष…

Read More

लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी अध्यक्षपदी अँड परिमल नाईक

*⚡सावंतवाडी ता.२५-:* लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी च्या अध्यक्षपदी अँड. परीमल नाईक यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पदग्रहण शपथविधी कार्यक्रमात त्यांची ही निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी उपस्थित सर्व सदस्यांनी व पदाधिकाऱ्यानी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Read More
You cannot copy content of this page