बांदा नीमजगा प्राथमिक शाळेच्या पालक व्यवस्थापन समितीवर संदीप बांदेकर यांची अध्यक्ष म्हणून निवड…

*⚡बांदा ता.१६-:* बांदा निमजगा येथील जि.प.पू. प्रा. शाळेत नवीन शाळा व्यवस्थापन पालक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीवर सामाजिक कार्यकर्ते संदीप बांदेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून, शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता राऊळ आणि सर्व पालक यांनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.

यावेळी समिती उपाध्यक्षपदी शिल्पा सावंत यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित माजी सरपंच शांताराम उर्फ बाळा आकेरकर, शिवराम बहिरे, दीपक नाईक, देवानंद पेडणेकर, समीक्षा बांदेकर, शैलेश शेटकर, कृतिका सावंत, मनाली भोगले, मालू खनगावकर, समीक्षा तांडेल, गायत्री गडेकर, अमित चारी, शितल बेळगावकर, शितल बहिरे, सुहासिनी कानसे उपस्थित होते.

You cannot copy content of this page