श्री दत्तमंदिर बिडवाडी येथे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

*⚡कणकवली ता.१६-:* कणकवली तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या श्री दत्त मंदिर बिडवाडी येथे दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहपूर्ण व विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासहित साजरा होत आहे. मंगळवार दिनांक १४ डिसेंबर पासून या उत्सवाला सुरवात झाली आहे. दररोज सकाळी श्रीदत्त पूजा आरती महाप्रसाद आदींसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या उत्सवात होत आहे. १६ तारीख ला श्रींची पूजा आरती व महाप्रसाद झाल्यानंतर सायंकाळी बिडवाडी येथील महिलांसाठी होममिनिस्टर तर रात्री ह. भ. प. चिंतामणी सामंत बुवा यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

रात्री १० वाजता पालखी प्रदक्षिणा, शुक्रवार दिनांक १७ रोजी धार्मिक विधींसोबत ग्रामस्थांची भजने व रात्री कीर्तन होणार आहे. त्यासोबत श्रींची पालखी प्रदक्षिणा होणार आहे. शनिवार दिनांक १८ रोजी सकाळी धार्मिक विधी आरती, महाप्रसाद त्यानंतर कीर्तन सायंकाळी श्री दत्त जन्मोत्सव होणार आहे त्यानंतर पालखी प्रदक्षिणा व रात्रौ दशावतार नाटक होणार आहे. रविवार दिनांक २० रोजी दुपारी महाप्रसाद त्यानंतर सांगता समारंभ होणार आहे संपूर्ण उत्सव कोरोनाचे नियम पाळून साजरा होत असूनया सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री गुरुदेव दत्त उत्सव कमिटी बिडवाडी व बिडवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page