दबा धरून बसलेल्या मगरीचा बकरीवर प्राणघातक हल्ला
मडुरा बाबरवाडी येथील घटना : पशुपालक भीतीच्या छायेखाली *⚡बांदा ता.३०-:* मडुरा बाबरवाडी येथील जितवना भागातील माती नाला बंधाऱ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या बकर्यावर दबा धरून बसलेल्या मगरीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज सायंकाळी घडली. या हल्ल्यात बकर्याच्या मानेवर गंभीर जखमा झाल्या आहेत. मालक केदू कानू शेळके यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवित मगरीवर दगडांचा वर्षाव केल्याने मगरीच्या तावडीतून…
