*⚡कणकवली ता.३०-:* मी महिला म्हणून कधीच कोणाचा अपमान केला नाही, महिलांचा आदर करणे ही आमच्या बाळासाहेबांची शिकवण आहे. आणि ती मी पाळली आहे. विरोधकांना पराभव समोर दिसल्याने त्यांची ही व्यवस्था झाली आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. दरम्यान सकाळी झालेल्या प्रकाराबाबत सतीश सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे.
सकाळी कणकवली येथे सतीश सावंत यांनी संजना सावंत व त्या ठिकाणी असलेल्या अन्य महिलांना शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. दरम्यान त्यांना या प्रकरणी तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाभरातील महिला भाजपाचे पदाधिकारी करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर श्री.सावंत यांनी आपली ही प्रतिक्रिया दिली आहे.
