*⚡मालवण ता.३०-:* नांदरुख-घरटणवाडी येथे दत्तजयंती उत्सवानिमित्त घरटणवाडी तरूण विकास मंडळ आणि नांदरुख ग्रामस्थ यांच्या वतीने आधारकार्ड दुरुस्ती शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ८० नागरिकांची आधारकार्ड दुरुस्ती करण्यात आली. गावातील ग्रामस्थ व महिलांनी याचा लाभ घेतला. या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल घरटणवाडी तरुण विकास मंडळाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
नांदरूख येथे आधारकार्ड दुरुस्ती शिबिर
