शिवसेनेकडून फटाके वाजवत जल्लोष;दोन्ही बाजूच्या घोषणांनी वातावरण तंग
*⚡कणकवली ता.३०-:* जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया कणकवली येथील तहसीलदार कार्यालयात पार पडली. मतदान संपल्यावर शिवसेनेकडून फटाके वाजवून मोठा जल्लोष करण्यात आला. तसेच सतीश सावंत यांना कार्यकर्त्यांनी उचलून घेत जणू विजयोत्सव साजरा केला. घोषणाही दिल्यात. दरम्यान, यावेळी मतदान संपल्यावर शिवसेनेचे सतीश सावंत यांसह कार्यकर्ते जात असताना भाजपाकडून देखील जोरदार म्याव म्याव … च्या घोषणा देण्यात आल्यात. त्याला प्रतिउत्तर शिवसेन कार्यकर्त्यांकडून कॉक कॉक…बाबा मला वाचवा आदी घोषणा दिल्याने त्यावेळी परस्पर जणू घोषणायुद्ध पाहायला मिळाले.
तर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येत घोषणाबाजी करताना दिसल्यावर तात्काळ पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना रोखले. तसेच बंदोबस्त वाढवा. त्यानंतर मतदानकेंद्रातून जल्लोष करत सतीश सावंत हे कणकवली शिवसेनेच्या कार्यालयात गेले. सोबत आम. वैभव नाईक, संदेश पारकर, सुशांत नाईक, कन्हैय्या पारकर, अतुल रावराणे, सजंय आग्रे व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
