Global Maharashtra Breaking News

कणकवलीत विनामास्क फिरणार्‍यांविरुद्ध दंडात्मक कारवाई

*⚡कणकवली ता.०८-:* गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने कणकवली दाखल झाले आहेत. शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी येणारे काही नागरिक विनामास्क फिरत आहेत, तर काही व्यापारी देखील विनामास्क विक्री करत त्यांच्याविरुद्ध नगरपंचायत प्रशासनाने पोलिसांच्या सहकार्याने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. कणकवली शहरात नगरपंचायत व पोलीस प्रशासनाने विनामास्क फिरणार्‍याविरुद्ध कारवाई करण्यासाठी आप्पासाहेब पटवर्धन चौकासह वर्दळीच्या ठिकाणी ही पथके तैनात ठेवली…

Read More

शेर्ले जुना कापई पूल पाण्याखाली

*⚡बांदा दि.०८-:* सावंतवाडी तालुक्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेर्ले जुना कापई पूल आज दुपारी पाण्याखाली गेला. जुलै महिन्यात आलेल्या महापुराची धास्ती कायम असल्याने ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांनी मात्र दक्षता बाळगण्याचे दिसून आले. सुमारे एक फूट पुलाच्यावर पाणी आल्याने बघ्यांची मात्र गर्दी झाली होती. दुपारी पुलावर आलेले पाणी उशिरापर्यंत कायम होते.

Read More

वाढत्या माहगाईवर नियंत्रण आणा कंत्राटी कामगार कायदा रद्द करा

भारतीय मजदूर संघातर्फे प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने *⚡कणकवली ता.०८-:* पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करा, वाढत्या माहगाईवर नियंत्रण आणा, कंत्राटी कामगार कायदा रद्द करा या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघातर्फे प्रांताधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी संघाचे अध्यक्ष भगवान साटम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ४५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४८ हजार ४०९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १हजार ३६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

मळेवाड रस्त्यातील खड्डयात वृक्षारोपण

चतुर्थीपूर्वी खड्डे न बुजविल्यास आंदोलन सावंतवाडी-: मळेवाड रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वृक्ष रोपण करण्यात आले असून लवकरच आंदोलन छेडण्यात येणार आहे. सावंतवाडी मळेवाड शिरोडा, आरोंदा, सातार्डा या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत.सावंतवाडी मळेवाड मार्गाचे डांबरीकरणाचे काम मंजूर होऊन दोन वर्ष उलटून गेली आहेत.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष व लोकप्रतिनिधींची निष्क्रियता यामुळे हे डांबरीकरण रखडलेले…

Read More

मळेवाडमध्ये उज्वला गॅस वितरण

पाच महिलांना मिळाला लाभ;सरपंच हेमंत मराठे, ग्रामविस्तार अधिकारी अनंत गांवकर होते उपस्थित *⚡सावंतवाडी ता.०८-:* मळेवाड गावातील पाच महिलांना उज्वला गॅसचे वितरण करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या वतीने ज्या कुटुंबांकडे गॅस नाहीत अशा कुटुंबातील महिलांना चुलीवर जेवण करावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्यासाठी धोका निर्माण होत होता. याचा विचार करून कुटुंबातील महिलेला उज्ज्वला गॅस…

Read More

चिपी विमानतळावरून केंद्र व राज्य सरकार मध्ये संघर्ष निर्माण करणाऱ्यांना वेळीच रोखा – आ. केसरकर

*⚡सावंतवाडी ता.०८-:* संघर्षातून जर चीपी विमानतळाचे उद्घाटन होणार असेल तर पर्यटक येणार कसे त्यामुळे हे वाद कुठे तरी थांबले पाहिजे. या विमानतळाला कोणत्याही प्रकारचे अनुदान देण्यात आले नाही महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प आहे. राज्याच्या उद्योग मंत्रांचे त्यावर नियंत्रण आहे. त्यामुळे निवांत सुरू होत असताना केंद्र व राज्य असा जर कोण संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असे…

Read More

उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार विजेत्यांचा सत्कार

आ दीपक केसरकर यांनी केला सन्मान *⚡सावंतवाडी ता.०८-:* साक्षरता दिनाचे औचित्य साधून आज सावंतवाडी येथे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. यावेळी आमदार दिपक केसरकर बोलताना म्हणाले की, मुंबई विद्यापीठचे उप केंद्र सावंतवाडी शहरात होणार असून, यात जगातील सर्वोकृष्ट अभ्यासक्रम शिकवले जातील. असे प्रतिपादन आमदार केसरकर यांनी…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.०८-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून 3030 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून सध्या या प्रकल्पामध्ये 401.8140 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 89.82 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 72 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 84.7070, अरुणा – 79.6012,…

Read More

सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 71 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.०८-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 71 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 57.375 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3461.8575 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 61(3363), सावंतवाडी –…

Read More
You cannot copy content of this page