बाबा परब यांचे मालवण भाजप व युवामोर्चातर्फे अभिनंदन

*⚡मालवण ता.३१-:* जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजय मिळविणारे भाजपचे उमेदवार संदीप उर्फ बाबा परब यांचे मालवण तालुका भाजप व भाजप युवा मोर्चा मालवण तालुका यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. मालवण तालुका भाजपच्या वतीने भरड नाका येथे बाबा परब यांचे स्वागत करून अभिनंदन करण्यात आले.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सचिव महेश मांजरेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर, विजय केनवडेकर, रवी मालवणकर आदी व इतर उपस्थित होते तर भाजप युवा मोर्चा मालवण तालुका व शहरच्या वतीने बाबा परब यांचे चिवला बीच येथे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, सभापती अजिंक्य पाताडे, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, शहराध्यक्ष ललित चव्हाण, अमोल हुनारी, हरिष गावकर, विपुल परब, अमू हर्डीकर, निकीत पराडकर, धनंजय मांजरेकर, कौस्तुभ कीर्तने, राजेश पारकर, नारायण लुडबे, राजेश कडू आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page