मालवण (प्रतिनिधी) श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहीर झाला आहे. यात चित्रकला स्पर्धेत दुर्वा साळकर, हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धेत भातिका चव्हाण तर कथाकथन स्पर्धेत मल्लप्रभा पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. चित्रकला स्पर्धेत वेदिका करवडकर यांनी द्वितीय तर ततृतीय क्रमांक तनिष्का वारंग यांनी मिळविला. उत्तेजनार्थ स्नेहा गुरव,दुर्गेश सारंग यांना गौरविण्यात आले. हि स्पर्धा संस्थेचे कार्यकारीणी सदस्य आबा रेडकर, देणगीदार विवेक सुखटणकर, व प्रकाश महाभोज यांनी पुरस्क्रूत केली होती. हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक ऋतूजा माटे तर त्रूतीय क्रमांक प्रांजल घाडी हिने मिळविला. उत्तेजनार्थ तनिष्का वारंग, दिशा धुरी, रिया आचरेकर यांना गौरविण्यात आले. सदर स्पर्धा श्रीमती शोभा सुखटणकर व मिथिला नेरुरकर यांनी पुरस्क्रूत केली होती. कथाकथन स्पर्धेत द्वितीय क्रमांक सई घुटूकडे हिने तर त्रूतीय क्रमांक भाविका चव्हाण हिला मिळाला. उत्तेजणार्थ ऐश्वर्या परब,पुर्वा गुरव,म्रूणाल धुरी यांना गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण बाबाजी भिसळे व अशोक कांबळी यांनी केले. सुत्रसंचालन भावना मुणगेकर यांनी केले. सदर स्पर्धा कै महादेव ठाकूर, कै. काशिबाई ठाकूर यांच्या स्मरणार्थ श्रीमती विजयालक्ष्मी ठाकूर यांनी पुरस्क्रूत केली होती. सर्व विजेत्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी, उपाध्यक्ष बाबाजी भिसळे कार्यवाह अर्जुन बापर्डेकर सर्व समिती सदस्य, सांस्कृतिक समिती सदस्य, वाचनालय कर्मचारी वर्गाकडून अभिनंदन करण्यात आले.
आचरा येथील रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिरच्या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर
