Headlines

अक्कल असलेल्यांचा हाती सत्ता दिली

नारायण राणेंचा अजित पवारांना टोला;35 मते न मिळणारा आमदारकीची स्वप्ने पाहतोय

कणकवली 31 डिसेंबर(प्रतिनिधी) जिल्हा बँकेची निवडणुकीत भाजपचा विजय झाला. हा विजय मिळविता अक्कलेचा वापर झाला, आणि अक्कल असलेल्यांच्या हाती देव देवतांनी जिल्हा बँकेची सत्ता दिली, अशी कोपरखळी केंद्रीय मंत्री नारायण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेतला मारली.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपाचा विजय झाला या विजयाचे श्रेय जिल्हावासीयांसह आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, राजन तेली यांच्यासह सर्वच कार्यकर्त्यांना जात आहे.ही निवडणूक जिंकण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने धनलक्ष्मी व सर्व यंत्रणेचा वापर केला, असा गंभीर आरोप श्री. राणे यांनी केला. जिल्हा बँके ची निवडणूक जिंकल्यानंतर भाजप महाराष्ट्र जिंकण्याकडे मोर्चा वळवणार असल्याचेही राणेंनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत १९ पैकी ११ जागा भाजपाने जिंकून एक हाती सत्ता मिळविल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवलीत येऊन सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आणि ओम गणेश निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, रणजीत देसाई, नगराध्यक्ष समीर नलावडे, अशोक सावंत, सुरेश सावंत, सभापती मनोज रावराणे, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगरसेविक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्राला पूर्णवेळ मुख्यमंत्री नाही, त्यामुळे हे प्रगतशील राज्य अधोगतीकडे नेण्याचे काम मविआ सरकार नेत आहे. जिल्हा बँक ही शेतकरी व सर्वसामान्यांची आहे. त्यांच्यासाठी जिल्हा बँकेचा वापर केला जाईल. शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी व्हॉल्यू अ‍ॅडेट प्रोडक्ट याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना प्रोडक्ट पुरविले जाणार आहे. बारामती येथे साखर कारखाना घेण्यासाठी जिल्हा बँकेतून कर्ज दिला जाणार नसल्याचे राणे सांगितले. राजन तेली यांनी आपला पराभव झाल्यानंतर त्यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत पक्ष निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या उमेदवाराला 35 मते मिळवता येत नाही, तो विधानसभेची स्वप्न पाहत असल्याचा चिमटा सतीश सावंत यांचे नाव घेतला काढून आमच्या एका महिला कार्यकर्त्या त्यांना चांगला धडा शिकवला आहे. सर्वांना पुरुन उरलो म्हणून केंद्रात मंत्री झालो, असे श्री. राणे यांनी सांगितले. विठ्ठल देसाई यांच्या विजय पहिला असून ही विजयाची चुणूक असल्याचे राणे यांनी सांगितले. विरोधी गटातील संचालक भाजपकडे येण्यास इच्छुक असल्यास त्यांचे स्वागत करून मानसन्मान देऊ, सगळे नाही त्यातील काही निवडकांना घे, त्यातील काही जणांचे मला फोन देखील आल्याचे श्री. राणे यांनी स्पष्ट केले. माझे संपर्कात कोन नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. पत्रकार परिषद संपल्यानंतर केंद्रीय नारायण राणे यांनी जिल्हा बँकेवर निवडून आलेल्या भाजपच्या 11 संचालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

You cannot copy content of this page