जिल्हा बँक निवडणुकीनंतर कणकवली शिवसेना कार्यालयात पसरला सन्नाटा

तर भाजपाकडून जोरदार जल्लोष

कणकवली 31 डिसेंबर (प्रतिनिधी)- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिद्धिविनायक भाजपप्रणीत पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून ही बँक पुन्हा एकदा ना.नारायण राणे यांच्या ताब्यात राहिली आहे.त्यामुळे एकाबाजुला भाजपाकडून कणकवलीत विजयोत्सवाचा जल्लोष तर शिवसेनेच्या कार्यालयात सन्नाटा पसरलेला पाहायला मिळत आहे १९ पैकी ११ जागांवर विजय संपादन करत जिल्हा बँकेत भाजपप्रणीत सिद्धिविनायक पॅनलने आपल्या ताब्यात राखण्यात यश मिळविले आहे.

त्यामुळे एकाबाजुला भाजपाकडून कणकवलीत विजयोत्सवाचा जल्लोष तर शिवसेनेच्या कार्यालयात सन्नाटा पसरलेला पाहायला मिळत आहे. तसेच भाजपाकडून मिरवणूक काढण्याची शक्यता असल्याने शिवसेना कार्यलयासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

You cannot copy content of this page