फोंडाघाट येथे 2 जानेवारी कुमार/कुमारी गट कणकवली तालुका कबड्डी निवड चाचणी

*⚡कणकवली ता.३१-:* कुमार/ कुमारी गट कणकवली तालुका कबड्डी निवड चाचणी 2 जानेवारी २०२२ रोजी आझाद स्पोर्टस् येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कणकवली तालुका कबड्डी असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या निवड चाचणीतुन कणकवली तालुक्याचा कुमार / कुमारी संघ निवडला जाणार असून निवडलेले दोन्ही संघ ओरोस येथे 15 ते 16 जानेवारी २०२२ या कालावधीत होणाऱ्या कुमार / कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत कणकवलीचे प्रतिनिधित्व करणार आहे. सदर निवड चाचणीस सकाळी ९ वा.सुरुवात होणार असून सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूने तालुका कबड्डी असोसिएशनकडे आपली नोंद व खेळाडू संलग्नता करावयाची आहे. तालुका निवड चाचणी कबइडी स्पर्धेत सहभागी होऊ इच्छीणाऱ्या कुमार गट मुलगे वजन ७० किलो व कुमारी गट मुली वजन ६५ किलो तर दोन्ही गटासाठी वयोमयीदा २० वर्षांखालील ( जन्मतारीख ३१/०३/२००२ व त्यानंतर जन्मलेले) ग्राहय धरली जाणार आहे. आधारकार्ड व पुरावा म्हणून जोडण्यात येणारा दाखला या दोघावरही जन्मतारीख समान असणे बंधनकारक आहे. वयाच्या दाखल्याबाबत आधारकार्डची मूळ प्रत सोबत असणे बंधनकारक आहे. दहावी व बारावी परीक्षा दिलेल्या खेळाडूंनी परीक्षा हॉलची रंगीत छायांकित प्रत द्यावी, दहावी-बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याने परीक्षा अर्ज भरल्यानंतर प्रीलिस्टची प्रत मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीनिशी द्यावी. माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या खेळाडूंसाठी शाळेचा यू-डायस नंबर व स्टुडंट आयडी असलेल्या बोनाफाईड व निर्गम उताऱ्यावर खेळाडूच्या फोटोवर मुख्याध्यापकाने अर्ध साक्षांकित केलेले असावे.

पहिलीत प्रवेश घेतल्याचा निर्गम उतारा आणावा. या वयाच्या पुराव्याव्यतिरिक्त अन्य कोणताही पुरावा ग्राहय धरला जाणार नाही. यापैकी कोणताही एक दाखला व आधारकार्ड यांच्या मूळप्रती सोबत ठेवाव्यात. सहभागी होणाऱ्या संघानी/खेळाडूंनी सोबत जेवणाचा डबा, पाणी, प्रथमोपचार साहित्य, खेळाचा गणवेश ठेवावा. अधिक माहितीसाठी कणकवली कबड्डी असोसिएशनचे श्री बायाजी बुराण सर -9421144605 व श्री दिपक ईस्वलकर- 9764036381, श्री दिपक चव्हाण- 9273687456 व रुपेश वाळके- 9422808532 यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल हळदिवे व उपाध्यक्ष संदेश पटेल यांनी केले आहे

You cannot copy content of this page