Global Maharashtra Breaking News

नाटळ मल्हार नदीवरील पूल जनतेसाठी झाला खुला

खास. विनायक राऊत, आम.वैभव नाईक , सतीश सावंत यांच्यासह शिवसेना नेत्यांची उपस्थिती *⚡​कणकवली ता.०९-:* कणकवली नाटळ मार्गावर मल्हार नदीवरील जुना पूल काही महिन्यांपूर्वी कोसळल्यानंतर याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले होते. व यानंतर गणेशोत्सवापूर्वी मल्हार नदीवरील नवीन पूल वाहतुकीस सुरू झाला. त्याचे लोकार्पण खास. विनायक राऊत, आम. वैभव…

Read More

खारेपाटण आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांचे 100% लसीकरण पूर्ण करणार

खारेपाटण रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष बाळा जठार यांनी दिली माहिती *⚡कणकवली ता.०९-:* खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटणच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण लवकरच १०० % पूर्ण करणार असल्याचा निर्धार खारेपाटण प्रा आ केंद्र रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी व्यक्त केला आहे. जि. प.च्या…

Read More

सावंतवाडी बाजारपेठ गर्दीने फुलली

माटवी सामान खरेदीसाठी गणेशभक्तांची गर्दी *⚡सावंतवाडी ता.०९-:* गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक रिवाजाप्रमाणे गणपतीची माटवी सजविण्यासाठी माटवी सामान खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत आहे.गणेश चतुर्थी एका दिवसावर येऊन ठेपली आहे. बाजारात अगोदरच विविध प्रकारच्या सामानाची रेलचेल वाढली आहे. यात पूजेचे सामान, गणपती सजावटीसाठी लागणारे रंग, मकर, भजनासाठी लागणाऱ्या वस्तू, विविध प्रकारचे पडदे आदी सामान…

Read More

सावंतवाडी शहरात प्रभागनिहाय लसीकरण मोहीम राबवावी

नगरसेवक अँड.परिमल नाईक यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी *⚡सावंतवाडी ता.०९-:* सावंतवाडी शहरात प्रत्येक प्रभाग निहाय सर्व्हेक्षण करून लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी नगरसेवक तथा नगरपरिषद माजी आरोग्य सभापती अँड.परिमल नाईक यांनी सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या निवेदनात नाईक यांनी म्हटले की, सावंतवाडी शहरात अजूनही बऱ्याच नागरिकांना कोविड- १९ प्रतिबंधात्मक लसीचा लाभ घेता आलेला नाही….

Read More

सावंतवाडी तालुका वकील संघटनेकडून दिवंगत जस्टीस सुनील पंडित वकील अलसुहेब डिंगणकर यांना वाहण्यात आली श्रद्धांजली

*⚡सावंतवाडी ता.०८-:* सावंतवाडी शहरातील दिवंगत जस्टीस सुमन पंडित व प्रतिथयश दिवंगत वकिल ॲड. अलसुहेब डिंगणकर यांना सावंतवाडी तालुका वकिल संघटने तर्फे आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी दोघांच्याही आठवणींना उजाळा देण्यात आला.यावेळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, सावंतवाडी श्रीमती आर. आर. बेडगकर मॅडम व सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती डी .बी . सुतार मॅडम, सावंतवाडी तालुका वकिल संघटनेचे…

Read More

सुप्रसिद्ध ठेकेदार महेश करलकर यांचे निधन

*⚡मालवण ता.०८-:* रेवंडी येथील सुप्रसिद्ध ठेकेदार आणि रेडी येथील रहिवासी महेश आत्माराम करलकर ( वय ५२ ) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ, बहीणी, पुतणे, काका, काकी असा परिवार आहे. वेंगुर्ला भाजप च्या माजी महिला तालुकाध्यक्षा मनाली करलकर यांचे पती तर रेवंडी येथील दुग्ध व्यावसायिक नरेश करलकर यांचे…

Read More

मालवण येथील आंबा व्यावसायिक कृष्णा गावकर यांचे निधन

*⚡मालवण ता.०८-:* मालवण वायरी गावकर वाडा येथील रहिवासी आणि आंबा तसेच कात व्यावसायिक कृष्णा गणपत गावकर वय ८३ यांचे आज सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास रेवतळे येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. श्री. कृष्णा गावकर हे मुंबई मध्ये सॉ मील येथून मशीन ऑपरेटर या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी मालवण येथे येऊन आंबा आणि…

Read More

अल्पमुदत कर्ज परतफेड करणाऱ्या संस्थाना लाभांश वाटप सुरू

जिल्हा बँक देत आहे स्वनिधीतून रक्कम ओरोस-:अल्पमुदत कर्ज घेणाऱ्या संस्था सभासदांचे व्याज परतफेड लाभांश रक्कम केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त झालेली नाही. २०१८-१९ व २०१९-२० या दोन वर्षांची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे संस्था अडचणीत आल्या आहेत. या संस्थाना आधार मिळावा या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने आपल्या स्वनिधीतून २०१८-१९ ची व्याज परतफेड लाभांश रक्कम देण्याचा निर्णय…

Read More

शासकीय कर्मचाऱ्यांना जिल्हा बँक देणार आगाऊ पगार

ओरोस-:कोकणातील गणेशोत्सव हा प्रमुख सण असून या कालावधीत मोठी आर्थिक उलाढाल होत असते. चालू वर्षी गणपती सण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आल्याने नोकरदारांना गणपती पूर्व सामान खरेदीसाठी पगार न झाल्याने पैशांची अडचण निर्माण झाली होती. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे सेवेतील प्राथमिक शिक्षकांच्या मासीक पगार तसेच निवृत्तीवेतन धारकांचे कामकाज जिल्हा बँकेमार्फत करण्यात येते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक…

Read More

जिल्हा बँकेचे वाहन कर्ज सुविधेत सवलत

ओरोस-:जिल्ह्यामध्ये दुचाकी, चारचाकी वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. यामध्ये जिल्हा बँकेचा वाटा मोठा असतो. गणेश चतुर्थीच्या काळात वाहन खरेदीसाठी जिल्हा बँकेकडून ‘मंगलमुर्ती वाहन कर्ज योजना’ राबविण्यात येत आहे. यामध्ये बँकेच्या प्रचलित व्याजदरापेक्षा एक टक्के कमी व्याज दराने ग्राहकांना तात्काळ वाहन खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रचलित पद्धतीत वाहन कर्जासाठी दोन नोकरदार जामीनदार…

Read More
You cannot copy content of this page