बापुभाई शिरोडकर स्मृती अष्टावधानी गुरू पुरस्कार सुरेश ठाकूर यांना जाहीर…

मालवण दि०२ प्रतिनिधी-: बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेतर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा ‘बापूभाई शिरोडकर स्मृती अष्टावधानी गुरू पुरस्कार कला, साहित्य, शिक्षण या . क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व, अनेकांचे गुरू व आचरा गावचे अष्टपैलू व्यक्तिमत्व सुरेश ठाकुर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण १७ जानेवारीला दुपारी ३ वाजता बॅ. नाथ पै सेवांगण, कट्टा येथे करण्यात येणार आहे.

विनोद शिरसाट (संपादक, साधना मासिक), देवदत्त परुळेकर (अध्यक्ष, बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण) व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नाथ पै सेवांगणतर्फे अध्यक्ष किशोर शिरोडकर, कार्यवाह श्याम पावसकर, कोषाध्यक्ष अरविंद शंकरदास यांनी सदर पुरस्काराची घोषणा केली. ठाकुर यांनी प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख म्हणून काम केले असून आपल्या शैक्षणिक कारकीर्दीत विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रम राबवून त्यात विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना घडविले. सेवानिवृत्तीनंतर अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, शाखा मालवण, कोमसाप शाखा मालवण या संस्थांचे अध्यक्षपद समर्थपणे सांभाळून साने गुरुजींचे विचार तसेच साहित्यिक चळवळ जोमाने वाढविली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना १९९२ मध्ये प्राप्त झाला. कथाकथन तंत्र आणि मंत्र याविषयी त्यांनी शाळा व महाविद्यालयातून महाराष्ट्रातील शिक्षक व विद्यार्थ्यांना “मार्गदर्शन केले. साने गुरुजी कथामाला, बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण, राष्ट्रसेवा दल पुणे विभाग यांच्यामार्फत महाराष्ट्रात बालनाट्य शिबिरे आणि व्यक्तिमत्व विकास शिबिरे आयोजित केली आहेत. विविध पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत.

You cannot copy content of this page