*⚡मालवण ता.०२-:* माळगाव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालय आयोजित शैक्षणिक उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी जलद सायकल चालविणे स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सायकल चालवण्याचे फायदे व पर्यावरण संदेश देणा-या या स्पर्धेचे उद्घाटन श्री. बबन सरनाईक यांच्या हस्ते झेंडा फडकवून करण्यात आले.
यावेळी पोलिस पाटील किशोर जाधव, अध्यक्ष अरुण भोगले, सचिव गुरुनाथ ताम्हणकर, संचालक महादेव सुर्वे, अरुण वझे, ग्रंथपाल तन्वी राणे, छाया नाईक, मनाली परब, अमित भोगले, सुधीर पडेलकर, मुरलीधर हडकर, किशोर कासले, किशोर यादव, दाजी वंजारे, बंटी खोत, अनिल भोगले, सूरज धामापुरकर, सुनिल भोगले, सुधीर परब, बाबू कासले आणि ग्रामस्थ उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – *गट- 1ली ते 4थी* प्रथम – वेदांत वैभव खोत, द्वितीय – निलेश सुधीर परब, *गट- 5वी ते 8वी* प्रथम-दुर्वेश बापू राणे, द्वितीय – देवांश सदानंद कबरे, तृतीय – कुणाल राजन परब, चतुर्थ – मयुरेश ज्ञानदेव सावंत. *गट- 9वी ते 12वी* प्रथम -सोहम संतोष भोगले, द्वितीय – पार्थ संजय खोत *गट- मुली* प्रथम – नितिशा शैलेश परब, द्वितीय – आर्या अनिल भोगले , तृतीय – दुर्वा दिलीप पाताडे चतुर्थ – यशश्री गुरुनाथ ताम्हणकर. यशस्वी स्पर्धकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना भेटवस्तू देवून मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
