मालवण: (प्रतिनिधी) सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या “आभाळमाया” ग्रुपने ३१ डिसेंबरचे औचित्य साधून अणाव येथील “आनंदाश्रय” आश्रमात संगीतमय सायंकाळ साजरी करत निराधारांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला.
आभाळमाया ग्रुपच्या सदस्य श्रीमती नम्रता डिचोलकर यांच्या सहकार्याने त्यांचे पुत्र कु. चंद्रशेखर याच्या विवाहानिमित्त आणि नूतन वास्तूप्रवेशा निमित्त यावेळी अन्नदान करण्यात आले. “आभाळमाया” ग्रुपचे सदस्य आनंद आचरेकर यांनी आपले बंधू कै. प्रवीण आचरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत विशारद संजय दळवी, छोटू ढोलम, संकेत मेस्त्री, नंदन म्हाडगूत, विवेक सावंत यांचा भजन गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
यामुळे उपस्थित निराधार व वृद्ध नागरिक आपल्या व्यथा विसरत भजन संगीतात रममाण झाले. या कार्यक्रमात “आभाळमाया” ग्रुपचे सदस्य नितीन शेट्ये, प्रवीण मिठबावकर, प्रदीप मिठबावकर, समीर रावले, राकेश गरे आदी उपस्थित होते.
