सायन येथे आयोजित रक्तदान सोहळ्यात सावंतवाडी येथील युवा रक्तदाता संघटनेचा सन्मान

*⚡सावंतवाडी ता.०२-: सायन हाॅस्पिटल, मुंबई येथे आयोजित भव्य रक्तदान सोहळ्यात युनिक ब्लड मोटिव्हेटर्सचे सर्वेसर्वा जय साटेलकर यांच्या हस्ते सावंतवाडी येथील युवा रक्तदाता संघटनेचा सन्मान करण्यात आला.

युवा रक्तदाता संघटनेचे सदस्य व रक्तदाते रोहित भिकाजी राऊळ यांनी हा सन्मान स्वीकारला गेली अनेक वर्षे युवा रक्तदाता संघटना रक्तदानाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा राज्यात कार्यरत आहे, तसेच रुग्णमित्र म्हणून झोकून देऊन कार्य करत आहे. कोरोना काळात संघटनेच्या माध्यमातून अनेक रक्तदान शिबीरे, तातडीच्यावेळी रुग्णांना रक्तदान केले. आजवर हजारो रुग्णांना जीवदान देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करण्यात आल असून या कार्याची दखल घेत नविन वर्षाच्या प्रारंभीला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. युवा रक्तदाता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी आयोजक, सर्व रक्तदान संस्था मुंबई यांचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page