मळगाव येथे उद्या शेतकरी मेळाव्याचे आयोजन

*⚡सावंतवाडी ता.०२-:* मळगाव-आजगावकरवाडी येथील सुधाकर भागवत भटजी यांच्या निवासस्थानी असलेल्या दत्त मंदिर येथे महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या सोमवार ३ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात आंबा व काजू मोहर संरक्षण मार्गदर्शन व प्रशिक्षण, माती परिक्षण व शेती व्यवस्थापन मार्गदर्शन आदी विषयांवर तज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्याचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी सहाय्यक मळगाव व प्राचार्य श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे.

You cannot copy content of this page