चिपी विमानतळास ‘ सिंधुदुर्ग एअरपोर्ट’ नाव द्या – रविकिरण तोरसकर
मालवण,दि प्रतिनिधी बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा चिपी येथील विमानतळाचे लवकरच उद्घाटन होत आहे. या विमानतळास सिंधुदुर्ग एअरपोर्ट असे नाव देण्यात यावे अशी मागणी नीलक्रांती पर्यटन संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी केली आहे. चिपी विमानतळावरून नेहमीप्रमाणे श्रेयवाद आणि नामांतर वादाच्या गर्दीत जिल्ह्यात होणार्या पहिल्या वहिल्या विमानतळाचा आनंद झाकोळला जाण्याची शक्यता आहे. श्रेयवादाचा विषय बाजूला ठेवला तर…
