Global Maharashtra Breaking News

देऊळवाडा – आडवण येथील धोकादायक वळणावर बसवण्यात आला कॉन्वेक्स मिरर

नगरसेवक दीपक पाटकर यांनी स्व खर्चाने बसवला मिरर मालवण दि प्रतिनिधी मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरानजीकच्या देऊळवाडा-आडवण या रस्त्याच्या धोकादायक वळणावर होत असलेले अपघात लक्षात घेऊन मालवणचे नगरसेवक दीपक पाटकर यांनी सामाजिक जाणिवेतून स्वखर्चाने त्या ठिकाणी कॉन्वेक्स मिरर बसविला असून यामुळे अपघात होण्याची शक्यता कमी झाली आहे मालवण देऊळवाडा येथून सातेरी मंदिर जवळ राहणाऱ्या…

Read More

माजी नगरसेवक विजय चव्हाण – गावकर यांचे अल्पशा आजाराने निधन

मालवण दि प्रतिनिधी मालवणचे माजी नगरसेवक तसेच मालवण तालुका खरेदी विक्री संघाचे माजी व्यवस्थापक आणि मालवण देऊळवाडा येथील रहिवासी विजय कृष्णाजी चव्हाण – गावकर यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. आंबा व्यावसायिक असणारे विजय चव्हाण-गावकर यांनी मालवण खरेदी विक्री संघात ४० वर्षे व्यवस्थापक म्हणून सेवा बजावली होती. मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या…

Read More

आरोग्य विभागाच्या भरतीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात परीक्षा केंद्र द्यावे

आ. वैभव नाईक यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी *⚡कणकवली ता.२८-:* कोविड-१९ च्या काळामध्ये अविरतपणे काम करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून या कोरोना योद्ध्यांना त्वरीत रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच भविष्यात आरोग्य भरती प्रक्रियेत भरती झाल्यास प्राधान्याने या कर्मचा-यांना कायमस्वरूपी समाविष्ट करून घेण्यात…

Read More

विविध मागण्यांसाठी केंद्रप्रमुख संघटनेचे आंदोलन

*⚡सिंधुदुर्गनगरी ता २८-:* महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने शालेय शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शालेय शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख यांच्या विविध मागण्या शासन स्तरावर अनेक वर्षे प्रलंबित आहेत . या मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने आज जिल्हाधिकारी…

Read More

स का पाटील महाविद्यालयाकडून मालवण बंदर जेटी परिसर स्वच्छ

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत राबवण्यात आला उपक्रम मालवण (प्रतिनिधी) जागतिक पर्यटन दिनानिमित्त मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वतीने आयोजित पर्यटन सप्ताह अंतर्गत आज मालवण बंदर जेटी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये महाविद्यालयाच्या प्राध्यापक, विद्यार्थी वर्गासह सेवाभावी संस्था देखील सहभागी झाल्या होत्या. स्वच्छता मोहिमेच्या प्रारंभी प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांनी सर्वांचे स्वागत…

Read More

व्यावसायीक गाड्यांचे थकीत रोड टँक्सवरील व्याज व दंड व्याज माफ करा

नाम.सतेज पाटील यांचे प्रदिप मांजरेकर यांनी वेधले लक्ष *⚡कणकवली ता.२८-:* व्यावसायीक गाड्यांचे थकीत रोड टँक्सवरील व्याज व दंड व्याज माफ करा अशी मागणी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी काँग्रेसचे जिल्हा संपर्कमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री नाम.सतेज पाटील यांच्याकडे केली आहे. कणकवली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी नाम. सतेज पाटील यांची ओरोस येथे भेट घेवुन…

Read More

युवा भजनी गायिका अंकिता मेस्त्री चा मसरेत सत्कार…

*⚡मालवण ता.२८-:* मसुरे देऊळवाडा गावची युवा महिला भजनी बुवा अंकिता बाबाजी मेस्त्री हिने अगदी अल्पावधीतच भजन क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून मसूरे येथे आदर्श शिक्षिका श्रीमती कल्याणी कांबळी यांच्या शुभहस्ते अंकिता मेस्त्री हिचा हृदय सत्कार करण्यात आला. अल्पावधीत महिला भजन क्षेत्रात केलेल्या गौरवास्पद कामगिरीबद्दल श्रीमती कल्याणी कांबळी यांनी तिचे विशेष कौतुक केले. मालवण तालुक्यामध्ये महिला…

Read More

मालवणात १ रोजी रक्तदान शिबिर

*⚡मालवण ता.२८-:* मालवण मधील एकता मित्रमंडळ आणि रोटरी क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्वेच्छिक रक्तदान दिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन दि. १ ऑक्टोबर रोजी बाजारपेठ कासार व्हाळी, देसाई बिल्डिंग, भरड मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत कोरोना विषयक शासकीय नियमांचे पालन करून संपन्न…

Read More

वेंगुर्ला नगरपरिषदे मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२१ अंतर्गत सायकल रॅली चे आयोजन

*⚡वेंगुर्ले ता.२८-:* भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव (AKAM) हि स्वच्छता व पर्यावरण संवर्धन मोहीम राबवली जात आहे.वेंगुर्ला नगरपरिषद स्वच्छतेमध्ये नेहमीच अग्रेसर राहिली आहे त्या अनुषंगाने दि २६/७/२०२१ ते २/१०/२०२१ पर्यंत स्वच्छता व पर्यावरण संवर्धन जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला.आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छता व पर्यावरण संवर्धन विषयक जनजागृती करण्यासाठी दि २/१०/२०२१ रोजी स्वच्छतेचे प्रेरणास्थान महात्मा…

Read More

कॉंग्रेसकडून तालुक्यात राष्ट्रवादीला जोरदार धक्का…

राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश सावंतवाडी ता.२८-:जिल्हा काँग्रेसने आज राष्ट्रवादी काँग्रेसला सावंतवाडीत जोरदार धक्का दिला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. यामध्ये सामाजिक न्याय विभाग माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा दक्षता, सहनियंत्रण शासकीय कमिटी सदस्य विजय कदम, सुनील उर्फ भाई सावंत, योगेश कदम, अरुण…

Read More
You cannot copy content of this page