कुडाळ तालुक्यात अकरा दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप
कुडाळ : तालुक्यात गुरुवारी मोठ्या उत्साहात व भावपूर्ण वातावरणात अकरा दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, मोरया मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, अशा घोषणांचा निनाद करीत आणि फटाक्याची आतषबाजी करीत वाजत- गाजत गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.यावर्षी अनंत चतुर्दशी २५ सप्टेंबर रोजी असली तरी बहुतेक…
