Headlines

Global Maharashtra Breaking News

शिरोडा येथील अंबरग्रीसप्रकरणी आणखी 5 जणांची चौकशी…

वेंगुर्ला ता.२१-: वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथील “ब्ल्यू व्हेल मासा उलटी” (अंबरग्रीस)प्रकरणी तिघांना जामीन मिळाला असून एकाला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. तरशिरोडा परिसरातील 2, गोवा मधील 1 व मालवण येथील 2 अशा एकूण 5 व्यक्तींची वनविभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.वनविभागाने 5 दिवसांपूर्वी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्येसुमारे 7 कोटी रुपये किमतीचे अंबरग्रीस…

Read Full News

तेंडोली-भोमवाडी येथील श्री देवी अनलादेवीचा वर्धापन दिन सोहळा २२ पासून…

कुडाळ : तालुक्यातील तेंडोली-भोमवाडी येथील श्री देवी अनलादेवीचा वर्धापन दिन सोहळा २२ ते २४ एप्रिल या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दि. २२ रोजी सकाळी ८ वाजता श्री जगदंबा अनलादेवी चरणी लघुरूद्राभिषेक, महापूजा, दुपारी १ वाजता नैवेद्य, प्रसाद, सायंकाळी ४ वाजता श्री भुमिका दशावतार मंडळ नितीन आसयेकर प्रस्तुत (मळगाव)…

Read Full News

डॉ. प्रत्युष रंजन बिस्वाल यांना आंतरराष्ट्रीय फिजिओ आयकॉन अवॉर्ड…

डॉ. बिस्वाल बॅ. नाथ पै फिजिओथेरपी कॉलेजचे प्र. प्राचार्य.. कुडाळ : येथील बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपी कुडाळ, सिंधुदुर्गचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल यांना नुकत्याच गोवा येथे झालेल्या इंडियन इंटरनॅशनल फिजिओथेरपी काँग्रेसमध्ये (आयआयपीसीमध्ये) प्रतिष्ठेचा फिजिओ आयकॉन अवॉर्ड प्रदान करण्यात आला.IIPC (इंडियन इंटरनॅशनल फिजिओथेरपी काँग्रेस) ही एक अग्रगण्य व्यासपीठ आहे. जी जगभरातील तज्ज्ञ, आघाडीचे…

Read Full News

कुडाळ प.स. सभेत घरकुलांसह अनेक मुद्दे चर्चेत…

⚡कुडाळ ता.२०-: घरकुल दुरुस्ती कामांना मंजुरी नाही, शाळा नादुरुस्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका, पकडलेल्या बिबटयांना वस्तीनजीकच्या जंगलात सोडले जाणे, मीटर नसतानाही ग्राहकाला वीज बिलाचा शॉक अशा अनेक प्रश्नांनी सोमवारी झालेली कुडाळ तालुका पंचायत समितीची मासिक सभा गाजली. तालुक्यातील अनेक प्रश्नांकडे पंचायत समिती सदस्यांनी लक्ष वेधत चिंता व्यक्त केली.     कुडाळ पंचायत समितीची सभा सोमवारी धर्मवीर छत्रपती…

Read Full News

मेढा येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…!

⚡मालवण ता.२१-:मालवण शहरातील मेढा येथील रहिवासी सर्वेश संतोष पराडकर (वय-३५) या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. याबाबत मालवण पोलीस स्थानाकात आकास्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. सर्वेश याच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेढा येथील सर्वेश पराडकर हा काल सोमवारी २० एप्रिल रोजी…

Read Full News

पिंगुळी येथे जिव्हाळा सेवाश्रमात साहित्य वाटप…

मनोरमा चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार.. कुडाळ : मनोरमा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमातील लाभार्थ्यांना खाऊ तसेच विविध आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे सेवाश्रमातील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.या कार्यक्रमास मनोरमा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी, सचिव संदीप साळसकर तसेच निवृत्त RTO अधिकारी महेंद्र पाटील व त्यांची पत्नी…

Read Full News

कुडाळ येथे २३ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा…

विविध विषयांवर होणार मार्गदर्शन:ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आयोजन.. ⚡कुडाळ ता.२१-: ग्राहक केंद्रबिंदू मानून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्तेयांच्यासाठी जिल्हास्तरीय एक दिवसीय ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा गुरूवार दिनांक २३ एप्रिल रोजी कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. संस्थेचे राज्य सचिव अरूण वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली हि कार्यशाळा होणार असून जिल्हा…

Read Full News

सर्वोदयनगरात गटार बांधकामाचा शुभारंभ…

सावंतवाडी : सर्वोदय नगर येथील दोन गटार कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी नगरसेविका निलम नाईक व नगरसेवक अजय गोंदावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला. पावसाळा तोंडावर आलेला असताना मुख्य रस्त्यावरील या दोन्ही गटार बांधकामाचा शुभारंभ आज करण्यात आला. सर्वोदय नगर येथील नागरिकांनी नुकतच प्रशासनाचे लक्ष वेधलेले असताना नगरसेविका…

Read Full News

श्वेता कोरगावकर यांनी राज्य व जिल्ह्यातील वाढत्या महिला व बाल अत्याचारांवर आतापर्यंत मौन का राखले..?

साक्षी वंजारी यांचा सवाल:शिंदे सेनेच्या केसरकर समर्थकांनी दिलेले प्रत्युत्तर हे विषय अज्ञान दर्शवणारे असल्याची केली टीका.. ⚡सावंतवाडी ता.२१-:सिंधुदुर्ग महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांनी भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांच्यावर टीका करत महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर अचानक व्यक्त होत असताना, राज्य व जिल्ह्यातील वाढत्या महिला व बाल अत्याचारांवर आतापर्यंत मौन का राखले..?, असा सवाल काँग्रेसच्या…

Read Full News

महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाच्या अधिवेशनात सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव…

⚡सिंधुदुर्ग दि.२१-: महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाच्या मिरज येथे पार पडलेल्या अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.

Read Full News

You cannot copy content of this page