पिंगुळी येथे जिव्हाळा सेवाश्रमात साहित्य वाटप…

मनोरमा चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार..

कुडाळ : मनोरमा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमातील लाभार्थ्यांना खाऊ तसेच विविध आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे सेवाश्रमातील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.
या कार्यक्रमास मनोरमा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी, सचिव संदीप साळसकर तसेच निवृत्त RTO अधिकारी महेंद्र पाटील व त्यांची पत्नी अंजू पाटील तसेच जिव्हाळा सेवाश्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय बिर्जे व सदस्य संतोष सांगळे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सेवाभावी कार्याचे महत्त्व अधोरेखित करत, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडून येतो, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

You cannot copy content of this page