सावंतवाडी : सर्वोदय नगर येथील दोन गटार कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी नगरसेविका निलम नाईक व नगरसेवक अजय गोंदावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
पावसाळा तोंडावर आलेला असताना मुख्य रस्त्यावरील या दोन्ही गटार बांधकामाचा शुभारंभ आज करण्यात आला. सर्वोदय नगर येथील नागरिकांनी नुकतच प्रशासनाचे लक्ष वेधलेले असताना नगरसेविका सौ. नाईक व नगरसेवक श्री. गोंदावळे यांच्या पुढाकाराने तात्काळ गटार बांधकामाच्या कामास प्रारंभ करण्यात आला.यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, सुनिता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, संतोष मठकर, श्री. पाटणकर, श्री. पालव, मेघना राऊळ, ज्ञानेश्वर सावंत आदींसह येथील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
