श्वेता कोरगावकर यांनी राज्य व जिल्ह्यातील वाढत्या महिला व बाल अत्याचारांवर आतापर्यंत मौन का राखले..?

साक्षी वंजारी यांचा सवाल:शिंदे सेनेच्या केसरकर समर्थकांनी दिलेले प्रत्युत्तर हे विषय अज्ञान दर्शवणारे असल्याची केली टीका..

⚡सावंतवाडी ता.२१-:
सिंधुदुर्ग महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांनी भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांच्यावर टीका करत महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर अचानक व्यक्त होत असताना, राज्य व जिल्ह्यातील वाढत्या महिला व बाल अत्याचारांवर आतापर्यंत मौन का राखले..?, असा सवाल काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान
महिला आघाडीच्या वतीने यापूर्वी एकही प्रेस नोट किंवा पत्रकार परिषद न घेता आता आरक्षणाच्या विषयावर भूमिका मांडली जात असल्याचे वंजारी यांनी नमूद केले. “ही बाब लक्षवेधी असून एक महिला म्हणून त्याचा आनंद आहे; मात्र याचप्रमाणे इतर गंभीर सामाजिक व कायदेशीर प्रश्नांवरही भूमिका का घेतली नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्या म्हणाल्या,डिलिमिटेशन “परिसीमन म्हणजे मतदारसंघांची पुनर्रचना. हा विषय सर्वसामान्यांना अवघड वाटू शकतो. भाजपला काँग्रेसचा अभ्यास नाही असे वाटत असल्यास, त्यांनी खुल्या चर्चेचे आयोजन करावे. त्यामुळे जनतेलाही या विषयाची सखोल माहिती मिळेल.” लोकशाहीत संवाद परस्पर असणे आवश्यक असल्याचे वंजारी यांनी सांगितले
यावेळी त्यांनी ‘रूल ६६’ बाबतही सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी समजून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच शिंदे सेनेच्या केसरकर समर्थकांनी दिलेले प्रत्युत्तर हे विषयाचे अज्ञान दर्शवणारे असल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान हिंसक आंदोलन व पुतळे जाळणे ही सिंधुदुर्गची संस्कृती नाही,” असे त्या म्हणाल्या.
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करण्यापेक्षा विधेयकातील त्रुटी समजून घेणे गरजेचे असल्याचे सांगत, “या विषयावर ठोस भूमिका घेणाऱ्या विरोधी पक्षाचे महिलांनी आभार मानले पाहिजेत,” असे वंजारी यांनी सांगितलं

You cannot copy content of this page