Headlines

Global Maharashtra Breaking News

पारंपारिक मच्छिमार सन्मेष परब यांनी केली ग्रीन सी कासवाची जाळ्यातून सुटका…

⚡मालवण ता.२२-:मालवण राजकोटसमोरील समुद्रात पारंपारिक मच्छिमार सन्मेष परब हे मासेमारीला गेले असता त्यांच्या जाळ्यात अनावधानाने अडकलेल्या ग्रीन सी या समुद्री कासवाची परब यांनी सुटका करत त्याला जीवदान दिले. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोरील समुद्रात सन्मेष परब हे मासेमारी करत असताना त्यांच्या जाळ्यात एक समुद्री कासव हे अडकलेल्या अवस्थेत आहे असे त्यांच्या निदर्शनास आले….

Read Full News

बांदा येथे आंबेडकर जयंतीनिमित्त २ मे रोजी भव्य सांस्कृतिक कार्यक्रम…

⚡बांदा ता.२२-: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच पवित्र बुद्ध पौर्णिमेच्या औचित्याने बांदा येथील आंबेडकर नगर समाज मंदिर येथे शनिवार दिनांक २ मे रोजी सायंकाळी ८ वाजता भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाज बांधवांसाठी आणि नागरिकांसाठी हा कार्यक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार असून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या कार्यक्रमाचे खास आकर्षण…

Read Full News

खानोलीत रंगला दशावतार कलेचा महाकुंभ.

भाजप युवा नेते विशालजी परब यांच्याकडून कलाकारांचा गौरव.. ⚡वेंगुर्ल ता.२२-: सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या खानोली गावामध्ये ‘खानोली दशावतार महोत्सवाचे’ अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. कोकणची लोककला असलेल्या दशावताराला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या महोत्सवाला भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना विशाल परब यांनी खानोलीवासीयांच्या या उपक्रमाचे कौतुक केले….

Read Full News

निगुडे पाटीलवाडीत विहिरीत पडून इसमाचा मृत्यू…

⚡बांदा ता.२२-: निगुडे-पाटीलवाडी येथील पीटर फ्रान्सिस फर्नांडिस (वय 45) यांचा विहिरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीटर फर्नांडिस यांना विहिरीच्या कठड्यावर बसून दारू पिण्याची सवय होती. नेहमीप्रमाणे ते तेथे गेले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी गुरे गोठ्यात असल्याने त्यांना…

Read Full News

जि.प. कृषी समितीने १.८८ कोटींच्या सुधारित अंदाजपत्रकास दिली मंजुरी…

⚡सिंधुदुर्गनगरी ता २२-:जिल्हा परिषद कृषी विभागाच्या जिल्हा परिषद सेस मधून सन २०२६- २७ साठी सुधारित एक कोटी ८८ लाख ६८ हजारच्या अंदाजपत्रकास आजच्या सभेत मान्यता देण्यात आली तर काही शेती विषयक योजना नव्याने तयार करण्याबाबत कृषी समिती सभेत निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषद कृषी समितीची सभा कृषी सभापती तथा उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांच्या…

Read Full News

राणें यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ युवा शेतकरी घडविण्याची योजना…

⚡सिंधुदुर्गनगरी ता २२-: कृषी व पशुसवर्धन विभागमार्फत खा. नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील ७५ युवा शेतकरी निवडून त्यांना कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सर्व योजनांचा लाभ देऊन त्यांना नव उद्योजक निर्माण करण्याची योजना आज उपाध्यक्ष दादा साईल यांनी सभेत मांडली. तसेच पशु पक्षी मेळाव्याचा ५० लाखांचा निधी या विभागाच्या अन्य योजनेवर वर्ग करण्याचा आणि…

Read Full News

पहिल्याच समाजकल्याण समिती सभेत अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर संताप…

सुमेधा पाताडे आक्रमक:निधी वाढ, पदभरती आणि योजनांच्या चौकशीसाठी ठराव;पालकमंत्र्यांकडून १४४ कामांची यादी सादर.. ओरोस ता २२समाजकल्याण समितीच्या पहिल्याच सभेला समाजकल्याण अधिकारी म्हणून कोणाचीच उपस्थिती नव्हती. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे प्रभारी पदभार देण्यात आला होता. परंतु त्याचवेळी कृषी समितीची सभा असल्याने त्यांनी फक्त सुरुवात करून देत कृषी समितीला निघून गेले. त्यामुळे समितीच्या ज्येष्ठ सदस्या सुमेधा पाताडे आक्रमक…

Read Full News

बळीराजा शेत पानंद रस्ता योजना समिती सदस्यपदी महेश संसारे यांची निवड…

⚡वैभववाडी ता.२२-: मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजना अंतर्गत कणकवली विधानसभा क्षेत्रस्तर समितीवर प्रगतशील शेतकरी महेश संसारे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे स्थानिक शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.नुकतीच कणकवली विधानसभा अंतर्गत समिती गठीत करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री यांची निवड जाहीर झाली आहे. वैभववाडी तालुक्यातील मांगवली गावचे सुपुत्र महेश संसारे…

Read Full News

काडसिद्धेश्वर संप्रदाय गुरुभक्त मंडळ, साटेली तर्फे २५ एप्रिलला आध्यात्मिक सत्संग सोहळा…

⚡दोडामार्ग ता.२२-: काडसिद्धेश्वर संप्रदाय गुरुभक्त मंडळ, साटेली यांच्या वतीने शनिवार, २५ एप्रिल २०२६ रोजी आध्यात्मिक सत्संग आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास Shri Kshetra Siddhagiri Mahasansthan येथील प.पू. काडसिद्धेश्वर महास्वामी महाराज यांची उपस्थिती लाभणार आहे.कार्यक्रमात सकाळी काकड आरती व सामुदायिक भजन, तर सायंकाळी स्वामी महाराजांचे आगमन, दर्शन व प्रवचन होणार आहे. रात्री महाआरती…

Read Full News

जि प सदस्य रुपेश पावसकर यांनी घेतली मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. डवंगे यांची भेट…

⚡कुडाळ ता.२२-: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.डवंगे यांची नेरूर-देऊळवाडा जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी भेट घेऊन रुग्णालयाचे काम तसेच रुग्ण समस्या यांचा आढावा घेतला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयाबाबत अनेक समस्या असल्याचे लोकांनी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यासंदर्भात त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर डवंगे यांची भेट घेतली. रुग्णालयातील समस्या…

Read Full News

You cannot copy content of this page