काडसिद्धेश्वर संप्रदाय गुरुभक्त मंडळ, साटेली तर्फे २५ एप्रिलला आध्यात्मिक सत्संग सोहळा…

⚡दोडामार्ग ता.२२-: काडसिद्धेश्वर संप्रदाय गुरुभक्त मंडळ, साटेली यांच्या वतीने शनिवार, २५ एप्रिल २०२६ रोजी आध्यात्मिक सत्संग आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास Shri Kshetra Siddhagiri Mahasansthan येथील प.पू. काडसिद्धेश्वर महास्वामी महाराज यांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमात सकाळी काकड आरती व सामुदायिक भजन, तर सायंकाळी स्वामी महाराजांचे आगमन, दर्शन व प्रवचन होणार आहे. रात्री महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सोहळा ओम गणेश मंडळ, ग्रामपंचायत पटांगण, साटेली (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) येथे पार पडणार असून भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page