Headlines

Global Maharashtra Breaking News

तळवडे येथे शेळीपालन प्रशिक्षण व कृत्रिम गर्भरेतन केंद्राचा शुभारंभ

सावंतवाडी ता.२५-: लहान लहान प्रयोग व्यावसायिकदृष्ट्या शेतकऱ्यांचा शाश्वत विकास करू शकतात. मुंबईसारख्या शहरातून नोकरी न करता तळवडे गावात येऊन शेळीपालन प्रशिक्षण केंद्र उभारणाऱ्या सुमीत भोसले याच्याबद्दल समाधान आहे. असे शेकडो सुमीत तयार झाल्यास तळवडे हे सिंधुदुर्ग जिह्याचे शेळीपालन प्रशिक्षण केंद्र व कृत्रिम गर्भरेतन सेंटर होऊ शकते. तसेच ज्या पद्धतीने हे प्रयोग सुरू आहेत त्यापद्धतीने पाहिल्यास…

Read More

वेंगुर्ला न्यायालयात १२ मार्च रोजी लोकअदालतीचे आयोजन

वेंगुर्ला प्रतिनिधी- तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसीऐशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ मार्च २०२२ रोजी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांनी दिलेल्या निर्देशांस अनुसरुन लोक अदालतीचे आयोजन…

Read More

वेंगुर्ला रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ

१ मार्च रोजी श्रींची रथातून प्रदक्षिणा वेंगुर्ला ता.२५-:* येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात आज दास नवमीपासून महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ झाला असून सकाळी श्रींच्या उत्सव मूर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले. ग्रामदैवत रामेश्वर मंदिरात दास नवमी ते महाशिवरात्रीपर्यंत प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्री उत्सव साजरा होत आहे. आज दास नवमी दिवशी महाशिवरात्रीला रथावर आरुढ होणा-या श्री देव रामेश्वराच्या उत्सव…

Read More

आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रोत्सवास लोटला भाविकांचा जनसागर…

मालवण ता.२४ प्रफुल्ल देसाई-: दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखली जाणारी आंगणेवाडी आज श्री देवी भराडीच्या वार्षिकोत्सवाच्या निमित्ताने भक्तीरसात न्हाऊन निघाली. श्री देवी भराडीच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविकांनी भराडीचे दर्शन घेत नवस फेडले. आज रात्री तर या यात्रोत्सवात गर्दीने उंचाक गाठला दिवसभरात विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी, पदाधिकार्‍यांनी, सिनेकलावंतांनी भराडीचे दर्शन घेतले. जागृकतेचा महिमा सांगणाऱ्या आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या…

Read More

कुडाळ मालवणच्या विकासासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत निलेश राणे यांना निवडून द्या…

आमदार नितेश राणे यांचे ग्रामस्थांना आव्हान… मालवण दि प्रतिनिधी आंगणेवाडी यात्रोत्सवात यात्रेकरू भाविकांना शुभेच्छा देताना आमदार नितेश राणे म्हणाले केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून आंगणेवाडीत आजपर्यंत कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली आहेत. मात्र अद्यापही या ठिकाणी विकास कामे प्रलंबित असून या कामांच्या पूर्ततेसाठी ना. राणे यांच्याकडे कोणत्या तोंडाने जाऊ? असा प्रश्न आज आंगणेवाडी ग्रामस्थांनी उपस्थित केला…

Read More

विरोधकांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य दे…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भराटी देवीला साकडे…. मालवण दि प्रतिनिधी माझ्याशी राजकारणात सूडबुद्धीने वागणाऱ्या, मला अडचणीत आणायचा प्रयत्न करून द्वेषाची भावना ठेवणाऱ्यांना देवीने दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य देवो आणि राणे कुटुंबियांना या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना सामोरे जाण्याची ताकद देवो, असे साकडे आपण देवीला घातल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी…

Read More

युक्रेनमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सहाय्याकरिता जिल्हा प्रशासनाच्या २२८८४७ तसेच टोल फ्री १०७७ वर संपर्क करा

निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड सिंधुदुर्गनगरी ता.२४-:* सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून १८००११८७९७ हा टोल फ्री क्रमांक तसेच जिल्हास्तरावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ०२३६२-२२८८४७ व १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती…

Read More

मडुऱ्यातील मिरचीला कुडपा रोगाचा प्रादुर्भाव

बांदा ता.२४-:* अवकाळी पावसाचा परिणाम मिरची उत्पादनावर झाला असून मडुऱ्यात मिरचीच्या रोपांना कुडपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. अनेक फवारणी करून सुद्धा रोग कमी होत नसून शेतकरी हवालदिल झाला आहे . त्यात योग्यप्रकारे मार्गदर्शन करण्यासाठी कोणताही कृषी अधिकारी येत नसल्याचे सांगत मिरची उत्पादकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. तसेच जर मिरचीचे नुकसान झाल्यास तीच रोपे तालुका कृषी…

Read More

आनंदव्हाळ येथे खाजगी बस आणि दुचाकीत अपघात

मालवण ता.२४-: आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीचे दर्शन घेऊन मुंबईला परतणाऱ्या खाजगी बस आणि मालवणला जाणाऱ्या ज्युपीटर या दुचाकीची आज गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आनंदव्हाळ येथील धोकादायक वळणावर अपघात होऊन या अपघातात युवती गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, अपघातानंतर पळून जाणाऱ्या खाजगी बसला स्थानिक ग्रामस्थांनी अडवून जाब विचारल्यानंतर नरमाईची भूमिका घेत बस…

Read More

३७०५ महिलांनी घेतले ५९४१ पाणी नमुने

संजना सावंत यांनी केला शुभारंभ;पाणी गुणवत्तासाठी जिल्हा परिषदेचे एकदिवसीय अभियान ओरोस-:जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या माध्यमातुन जिल्ह्यातील एकुण 5941 पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत्राचे 23 फेब्रुवारी रोजी 3705 महिलाच्या माध्यमातुन एफटिके किटच्या सहाय्याने पाण्याची तपासणी करण्यात आली.  अशी माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी दिली आहे. …

Read More
You cannot copy content of this page