वेंगुर्ला रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ

१ मार्च रोजी श्रींची रथातून प्रदक्षिणा

वेंगुर्ला ता.२५-:* येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात आज दास नवमीपासून महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ झाला असून सकाळी श्रींच्या उत्सव मूर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले. ग्रामदैवत रामेश्वर मंदिरात दास नवमी ते महाशिवरात्रीपर्यंत प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्री उत्सव साजरा होत आहे.

आज दास नवमी दिवशी महाशिवरात्रीला रथावर आरुढ होणा-या श्री देव रामेश्वराच्या उत्सव मूर्तीचे पूजन करण्यात आले. महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधून रविवार दि. २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्री रामेश्वर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तसेच १ मार्च महाशिवरात्रीदिवशी सकाळी धार्मिक विधी, रात्रौ सातेरी मंदिरातून तरंग देवतांचे आगमन झाल्यावर तरंग देवतांसह श्री रामेश्वराची पालखी व लालखी प्रदक्षिणा, त्यानंतर तरंग देवतांकडून रथावर नारळ वाढवून रथ प्रदक्षिणेस सुरुवात होईल. रथ प्रदक्षिणेनंतर नाईक मोचेमाडकर दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्यप्रयग होणार आहे. सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. .

You cannot copy content of this page