Headlines

Global Maharashtra Breaking News

कातवड कुदळभाम येथील श्री महापुरुष देवस्थानचा २ रोजी रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा…

⚡मालवण ता.२५-:मालवण तालुक्यातील कातवड कुदळभाम येथील श्री देव महापुरुष पार देवस्थानाच्या रौप्य महोत्सवी वर्ष – २५ व्या वर्धापन दिन सोहळ्या निमित्त शनिवार दि. २ मे रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री देव महापुरुष देवस्थानच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त सकाळी १० वा. लघुरूद्र होम, दुपारी १ वा. महाआरती, दुपारी ३ वा. सत्यनारायण…

Read Full News

भारतीय कामगार सेनेच्या चिटणीसपदी नारायण उर्फ सुधा आंगणे यांची निवड…

⚡मालवण ता.२५-:भारतीय कामगार सेनेच्या चिटणीसपदी आंगणेवाडी गावचे सुपुत्र आणि कामगार नेते नारायण उर्फ सुधा आंगणे यांची निवड करण्यात आली आहे. उबाठा शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही निवड मुंबई दादर येथे जाहीर करण्यात आली. भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत यांची ही निवड करण्यात आली आहे.नारायण उर्फ सुधा…

Read Full News

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात जागतिक हिवताप दिन साजरा…

मलेरिया निर्मूलनासाठी जनजागृती ; तपासणी व उपचार मोफत उपलब्ध.. कणकवली : उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे शनिवारी २५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सन २००७ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) ६० व्या अधिवेशनात मलेरिया हा केवळ आफ्रिका खंडापुरता मर्यादित नसून तो जागतिक स्तरावरील गंभीर आरोग्यविषयक प्रश्न असल्याचे अधोरेखित करण्यात आले. त्यामुळे ‘आफ्रिका…

Read Full News

शक्तिपीठ महामार्गाची अलाइनमेंट राधानगरी मार्गे फोंडाघाटला उतरवावी…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. सिंधुदुर्ग : नवीन रिवाईज शक्तिपीठ महामार्गाची अंतिम अलाइनमेंट राधानगरी मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट परिसरात उतरवून जिल्ह्याच्या पर्यटन व आर्थिक विकासाला चालना द्यावी, अशी मागणी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, राधानगरी परिसराच्या जवळून प्रस्तावित महामार्ग जात असल्याने हा मार्ग राधानगरीमार्गे…

Read Full News

कुडाळ न्यायालयात ९ मे रोजी राष्टीय लोकअदालत…

⚡कुडाळ ता.२५-: मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरुन दिवाणी न्यायालय (क स्तर) कुडाळ येथे शनिवार दि. ९ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता राष्टीय लोकअदालत आयोजीत करणेत आले आहे. तालुका विधी सेवा समिती कुडाळ व तालुका बार असाेशिएशन यांचे संयुक्त विदयमाने हे…

Read Full News

वादळी वाऱ्यामुळे सावंतवाडीत झालेल्या नुकसानाची पालकमंत्री नितेश राणे यांनी केली पाहणी…

नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त भरपाई देण्याचे आश्वासन; आपत्ती व्यवस्थापन टीम तैनात करण्याची तयारी.. ⚡सावंतवाडी ता.२५-: तालुक्यात मोठे नुकसान झाले असून त्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे. झालेल नुकसान मोठ असून जिल्हाधिकारी व प्रशासनाशी बोलून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळवून देता येईल ते बघू‌. जवळपास ६१ ठिकाणी नुकसान झाले असून शासनाच्या निकषानुसार तसेच चौकटी बाहेर जावून देखील…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यातीलवायंगणी ग्रामपंचायतीचा मानवतावादी निर्णय…

सरपंच अवी दुतोंडकर यांच्या निर्णयाचे तालुक्यातून कौतुक.. ⚡वेंगुर्ला ता.२५-: वेंगुर्ला तालुक्यातीलवायंगणी गावातील निराधार नागरिकांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय वायंगणी ग्रामपंचायतीने घेतला आहे. शुक्रवारी सरपंच दत्ताराम उर्फ अवी दुतोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेत एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला.वायंगणी गावातील निराधार नागरिकांसाठी घरपट्टी पूर्णतः माफ तसेच स्मशानभूमी शुल्क माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.या…

Read Full News

दोडामार्गमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न…

आमदार निलेश राणे यांचा सत्कार.. ⚡​दोडामार्ग ता.२५-:​दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह सरपंच, उपसरपंच आणि शिवसैनिकांची महत्त्वाची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत आमदार निलेश राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.​या प्रसंगी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि मोठ्या संख्येने…

Read Full News

सावंतवाडीत कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्याअभावी प्रशासन ढासळले…

नळपाणी व गॅस पाईपलाईन कामांमुळे नागरिक त्रस्त; पूर्णवेळ अधिकाऱ्याच्या नियुक्तीची देव्या सूर्याजी यांची मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२५-: शहरात सध्या नळपाणी योजना आणि गॅस पाईपलाईनची कामे युद्धपातळीवर सुरू असताना, शहराचा डोलारा सांभाळण्यासाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय कामांचा पुरता बोजवारा उडाला आहे. या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती नसल्याने नागरिकांच्या समस्या सुटण्याऐवजी वाढत चालल्या आहेत.सद्या कार्यरत असलेले प्रभारी मुख्याधिकारी श्री…

Read Full News

सावंतवाडी-दोडामार्ग-माजगाव केंद्रांवर शिष्यवृत्ती सराव परीक्षा उत्साहात संपन्न…

चौथीचे 202 व सातवीचे 86 विद्यार्थी सहभागी: गुणवंतांचा सन्मान;विक्रांत सावंत यांच्या संकल्पनेतून स्तुत्य उपक्रम.. ⚡सावंतवाडी ता.२५-: शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष तथा जि.प. सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी, दोडामार्ग आणि माजगाव या तीन केंद्रांसाठी आयोजित करण्यात आलेली शिष्यवृत्ती सराव परीक्षा उत्साहात पार पडली. या उपक्रमाला तिन्ही केंद्रांतून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या परीक्षेत…

Read Full News

You cannot copy content of this page