कातवड कुदळभाम येथील श्री महापुरुष देवस्थानचा २ रोजी रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा…

⚡मालवण ता.२५-:
मालवण तालुक्यातील कातवड कुदळभाम येथील श्री देव महापुरुष पार देवस्थानाच्या रौप्य महोत्सवी वर्ष – २५ व्या वर्धापन दिन सोहळ्या निमित्त शनिवार दि. २ मे रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री देव महापुरुष देवस्थानच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त सकाळी १० वा. लघुरूद्र होम, दुपारी १ वा. महाआरती, दुपारी ३ वा. सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद महाप्रसाद, सायंकाळी ६.३० वा. श्रीदेवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ कांदळगाव बुवा श्री. राजन कोदे यांचे सुस्वर भजन, सायंकाळी ७.३० वा. श्री ब्राह्मण देव प्रसादिक भजन मंडळ कातवड बुवा श्री. मंगेश नलावडे यांचे सुस्वर भजन, रात्री ९ वा. अमृतनाथ पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ म्हापण वेंगुर्ला, यांचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन श्री महापुरुष मित्रमंडळ कुदळभाम यांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page