वेंगुर्ला तालुक्यातीलवायंगणी ग्रामपंचायतीचा मानवतावादी निर्णय…

सरपंच अवी दुतोंडकर यांच्या निर्णयाचे तालुक्यातून कौतुक..

⚡वेंगुर्ला ता.२५-: वेंगुर्ला तालुक्यातील
वायंगणी गावातील निराधार नागरिकांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय वायंगणी ग्रामपंचायतीने घेतला आहे. शुक्रवारी सरपंच दत्ताराम उर्फ अवी दुतोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेत एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला.
वायंगणी गावातील निराधार नागरिकांसाठी घरपट्टी पूर्णतः माफ तसेच स्मशानभूमी शुल्क माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयामुळे गावातील गरजू, निराधार कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.यावेळी सरपंच अवी उर्फ दत्ताराम दुतोंडकर यांच्यासह, ग्रामपंचायत अधिकारी मधुकर नवार,
माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य रविंद्र धोंड, ग्रामपंचायत कार्यकारिणी सदस्य विनू मठकर, दिपाली नांदोसकर, विद्या कांबळी, सविता परब, विद्या गोवेकर, राखी धोंड आदी उपस्थित होते.समाजाभिमुख निर्णयामुळे वायंगणी ग्रामपंचायतचे तसेच सरपंच अवी दुतोंडकर यांच्या निर्णयाचे तालुक्यातून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page