Global Maharashtra Breaking News

माजगाव येथील सातेरी देवस्थानचा उद्या वार्षिक जत्रोत्सव

*⚡सावंतवाडी ता.१७-: माजगाव येथील जागृत श्री देवी सातेरी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या १८ जानेवारी रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी देवीवर अभिषेक, ब्राम्हणांच्या साक्षीने धार्मिक विधिवत पूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी केळी, नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे, देवीची ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री भव्य पालखी मिरवणुकीनंतर पार्सेकर दशावतार मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहेत. भाविकांनी कोरोना…

Read More

किर्लोस कृषी विज्ञान केंद्रावरील ते आरोप बिनबुडाचे

खोट्या आरोपांना कायदेशीररित्या उत्तर देऊ;सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानने दिला इशारा मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठानने कोरोना महामारीच्या काळामध्येही आपले काम चालू ठेवून सर्व कर्मचाऱ्यांना पगार चालू ठेवला. त्याबाबत कुठल्याही कर्मचाऱ्यांची कुठलीही तक्रार नसताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप जे लोक करत आहेत ते बिनबुडाचे असून हे बिनबुडाचे आरोप कदापि सहन केले जाणार नाहीत असा इशारा…

Read More

९ गुंठे जागेत शिवस्मारक तर उर्वरित ९ गुंठे जागेत स्थानिक व्यावसायिकाचे पुनर्वसन

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतराबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी काढला तोडगा *⚡कणकवली ता.१६-: कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पंचायत समिती लगतच्या १८ गुंठे शासकीय जागेत स्थलांतरित करीत असतानाच ९ गुंठे जागा शिवस्मारकासाठी तर उर्वरित ९ गुठे जागेत स्थानिक व्यावसायिकाच्या पुनर्वसनासाठी वापरण्याचा प्रस्ताव पालकमंत्री नाम.उदय सामंत यांनी ठेवला . या जागेची १९ जानेवारीला मोजणी केली…

Read More

कणकवली येथील पटकीदेवी मातेचा १९ जानेवारी रोजी वार्षिक जत्रौत्सव

*⚡कणकवली ता.१६-:* कणकवली गावाचे जागृत देवस्थान श्री पटकीदेवीचा वार्षिक जत्रौत्सव बुधवार १९ जानेवारी रोजी होणार आहे. यानिमित्त धार्मिक कार्यक्रम सकाळी देवीची विधिवत पूजा होणार असून दुपारी ३ वा.पासून सुहासिनींचा ओटी भरणेचा कार्यक्रम सुरु होणार आहे. शासनाने घालून दिलेले नियम व अटींचे पालन करून हा जत्रोत्सव साजरा होणार आहे. तरी या जत्रोत्सवाला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ…

Read More

हिंदू देवदेवतांचा अवमान खपवून घेणार नाही

मंगेश तळवणेकर यांचा इशारा;तृप्ती देसाई यांच्या वक्तव्याबाबत व्यक्त केली नाराजी सावंतवाडी : भूमाता बिग्रेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आपल्या वक्तव्यातून हिंदू धर्मियांच्या भावना वेळोवेळी दुखावत आहेत. हिंदू देवदेवता व साधुसंतांचा अवमान करीत आहेत. घटनेने दिलेले स्वातंत्र्य कोणत्याही धर्माविरुद्ध बोलण्यासाठी नाही, याचे भान राखूनच वक्तव्य करा, असा विनंतीवजा इशारा विठ्ठल-रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी शिक्षण व आरोग्य…

Read More

दत्ताराम सावंत यांना ‘नेशन बिल्डर’ पुरस्कार

विविध क्षेत्रातील योगदानाचा सावंतवाडी रोटरीतर्फे गौरव *⚡सावंतवाडी ता.१६-:* माडखोल-धुरीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक दत्ताराम सातू सावंत यांना रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांच्यावतीने ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. दत्ताराम सावंत यांनी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा व विधायक ठसा उमटविला आहे. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थी विकासासाठी व सामाजिक परिवर्तनासाठी…

Read More

खारेपाटण सम्यकनगर – बंदरवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

*⚡कणकवली ता.१६-:* कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील सम्यकनगर बंदरवाडी या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ नुकताच खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. या कार्यक्रमाला खारेपाटण उपसरपंच इस्माईल मुकादम,ग्रा प सदस्य योगेश पाटणकर,शमशुद्दीन काझी,श्रीम.रीना ब्रम्हदंडे, कामाचे ठेकेदार श्री .सावंत तसेच सम्यक नगर,खारेपाटण येथील रहिवासी चारुदत्त साटविलकर, चंद्रकांत पवार,रामदास जाधव,भास्कर तोरसकर आदी…

Read More

जिल्ह्यात आज आणखी २३७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१६-: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ९८८ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १२१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २३७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

एसटी संपावर मुख्यमंत्र्यांनीच तोडगा काढावा

मंगेश तळवणेकर यांची मागणी;विरोधी पक्षाच्या सहकार्याचीही व्यक्त केली गरज *⚡सावंतवाडी ता.१६-:* गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचारी संपामुळे कर्मचाऱ्यांसह प्रवासी, व्यावसायिक, विद्यार्थी आणि एसटी महामंडळाचेही अपरिमित नुकसान झाले आहे. तरीही अद्याप यावर ठोस तोडगा निघालेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यात गांभीर्याने लक्ष देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करावी आणि हा संप मिटवावा, अशी मागणी विठ्ठल-रखुमाई…

Read More

वायंगणी-बागायतवाडी येथे सिलिंडरच्या स्फोटात बाप-लेकाचा मृत्यू…

*⚡वेंगुर्ले ता.१६:* वायंगणी-बागायतवाडी येथे घरात सिलेंडरचा स्फोट होऊन वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. वसंत गणेश फटनाईक (७०) व गणेश वसंत फटनाईक (२९), अशी त्या दोघांची नावे आहेत. सुदैवाने वसंत यांची पत्नी मासे विकण्यासाठी बाहेर असल्यामुळे त्या अपघातात वाचल्या. मात्र घर अर्धे जळून खाक झाले आहे.

Read More
You cannot copy content of this page