आरवली- सोन्सुरे येथे रक्तदान शिबिराला प्रतिसाद
मनसेचे आयोजन वेंगुर्ल ता.०६-:* जिल्हा परिषद पूर्ण शाळा आरवली- सोन्सुरे (ता.वेंगुर्ला) येथे मनसेना व सिंधूरक्त मित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मनसे वेंगुर्ला तालुका सचिव राजाराम उर्फ आबा चिपकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उदघाटन गोरेगाव मुंबई मनसे शाखा अध्यक्षा श्रीम.उर्मिला नाईक यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन…
