गतवर्षी जिल्हा बँकेच्या ठेवींत १३१ कोटी ७३ लाखांची वाढ

कर्ज वितरण, वसुली, नफा, स्वनिधीत सुद्धा लक्षवेधी काम ;जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती

ओरोस ता.०६-:२०२१-२२ या आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेने सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. तब्बल १३१ कोटी ७३ लाख एवढ्या ठेवी वाढल्याने दोन हजार ४२३ कोटी ७६ लाख एवढ्या एकूण ठेवी झाल्या आहेत. प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी बँकेला नाबार्डचा अ वर्ग मिळाला आहे. तसेच निव्वळ एनपीए शून्य टक्के राहिला आहे. ठेवी, कर्जे, एकूण व्यवसाय, स्वनिधी, कर्ज वसुली, नफा यामध्ये लक्षणीय प्रगती केली आहे, अशी माहिती बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

२०२१-२२ या आर्थिक वर्षात जिल्हा बँकेने केलेल्या कामगिरीची माहिती देण्यासाठी मनीष दळवी यांनी सिंधुदुर्गनगरी येथील बँकेच्या प्रधान कार्यलयाच्या सभागृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक महेश सारंग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना दळवी यांनी, जिल्ह्यात बँकेच्या ९८ शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून वर्षभरात सर्व क्षेत्रात उल्लेखनीय काम झालेले आहे. आरटीजीएस, एनईएफटी, एटीएम, मोबाईल ऍप, आयएमपीएस, युपीआय, ई-कॉम, एबीपीएस, बीबीपीएस, सीटीएस, ई-मेल अकाउंट स्टेटमेंट इत्यादी आधुनिक बँकिंग सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत, असे सांगितले.

You cannot copy content of this page