मालवण ता.०६-:* मालवण तालुक्यातील तळगाव सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणूकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर सोसायटीच्या चेअरमन पदी प्रकाश पावसकर तर व्हाईस चेअरमन पदी राजेंद्र दळवी हे ७ विरुद्ध ६ मतांनी निवडून आले.
तळगाव सोसायटीची निवडणूक अलीकडेच झाली होती. गुरुवारी या सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी चेअरमन पदी प्रकाश पावसकर तर व्हाईस चेअरमन पदी राजेंद्र दळवी हे ७ विरुद्ध ६ मतांनी निवडून आले. यावेळी संचालक चेतन मुसळे, प्रविण जावकर, महेश परब, समृद्धी कुशे, वर्षा वाळके यांच्यासह भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी सभापती अजिंक्य पाताडे, जगदीश चव्हाण, प्रसाद मोरजकर, भाई राणे, चंद्रकात पेडणेकर, सागर कुशे, ऊमेश राणे, देऊ कदम, राजु दळवी, स्वप्निल गावडे, माधुरी बांदेकर आदी उपस्थित होते. दरम्यान, खासदार विनायक राऊत यांच्या गावातील म्हणजेच तळगाव सोसायटीवर भाजपच्या विजयानंतर भाजपा प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर ट्विट द्वारे टीका केली आहे. खास. राऊत यांना उद्देशून कोकणला लागलेला कोरोना आम्ही कायमचा घालवणार, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.
