मालवणात जल्लोष २०२२ पर्यटन महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मालवण ता.०६-:* मालवण नगरपरिषद, डीपीडिसी, पर्यटन विभाग यांच्या वतीने मालवण दांडी किनारी दि. १३ ते १५ मे या कालावधीत ‘जल्लोष २०२२’ या पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त ९ मे पासून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात नागरिकांनी तसेच पर्यटकांनी सहभागी होऊन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे.

पर्यटन महोत्सवा निमित्त ९ मे रोजी रांगोळी स्पर्धा, १० मे रोजी रिक्षा सजावट तसेच सायंकाळी ४ वाजता पर्यटन दिंडी, फॅन्सी ड्रेस होणार आहे. ११ मे रोजी सकाळी ७ वाजता बिच रन, सकाळी ८ वाजता सागरी जलतरण पर्यटन फोटोग्राफी स्पर्धा, १२ मे रोजी सकाळी ७ वाजता नौकानयन रॅली, संध्याकाळी ५ वाजता पतंगोत्सव आणि रॉक गार्डन येथे सायंकाळी ४ ते ७ वाजता लहान मुलांसाठी किलबिल हा विशेष कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार १३ मे रोजी सकाळी सायकल रॅली, वाळू शिल्प कलाकृती स्पर्धा होणार असून सायंकाळी ४ ते ५ यावेळेत स्थानिक मालवणी खाद्य पदार्थांची पाककला स्पर्धा, ५ ते ५.३० वाजता स्थानिक कलाकारांचे गायन, ५.३० ते ६ उद्घाटन समारंभ, ६.३० ते रात्री १० गायन व नृत्य स्पर्धा व स्थानिक दशावतार: महिला व पुरुष. शनिवार १४ मे रोजी सायंकाळी ४ ते ६ खेळ पैठणीचा, संध्याकाळी ७ ते रात्री १० मालवण सुंदरी स्पर्धा, आमदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धा होणार आहे. रविवार १५ मे रोजी सायंकाळी ५ ते ६ स्थानिक कलाकारांचे गीतगायन ६ ते ७ बक्षिस वितरण व सांगता समारंभ. ७ ते १० जल्लोष सिनेकलावंतांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम होणार आहेत. या पर्यटन महोत्सवा दरम्यान पर्यटकांना जलसफारी व वॉटरस्पोर्टचा मनमुराद आनंद सवलतीच्या दरात नगरपालिका, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि जलक्रीडा व्यवसांयीकाच्या मदतीने घेता येणार आहे. तसेच महोत्सवाच्या ठिकाणी स्थानिक खाद्य पदार्थांचे स्टॉल उभारण्यासाठी ९४२२४३५०९५ यावर संपर्क करावा, असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page