मालवण ता.०६-:* आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवण शहरासाठी विशेष बाब म्हणून ८ कोटींचा निधी मंजूर केला. वैशिष्ट्यपूर्ण योजना निधीतून शहरात अनेक विकासकामे होत आहेत. त्यापैकी मालवण रेवतळे फाटक शाळा मार्ग येथील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आज करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, राजू आंबेरकर, होळकर, किसन मांजरेकर, भाई कासवकर, शीला गिरकर, भाई देसाई, उमेश मांजरेकर, सुरेश मडये, सिद्धू मांजरेकर, बाबा मांजरेकर, नितेश नरे, सागर नरे, सचिन कांबळे, किरण हिर्लेकर, सुमित मांजरेकर, बाबू मांजरेकर, अजित मसुरकर, जया मसुरकर, भाऊ वाईरकर, प्रवीण आंबेरकर, अमित शिरोडकर, राखी हडकर, डीक्सन भुतेलो, संतोष कोळंबकर, प्रीती मांजरेकर, अशोक मांजरेकर, ओंकार मांजरेकर, राजा केरीपाळे यासह अन्य उपस्थित होते, अशी माहिती माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी दिली आहे.
