मालवण ता.०६-:* बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिराच्या गाभाऱ्यावरील कलशाचा वर्धापन दिन सोहळा शनिवार ७ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सकाळी ९ ते १२ धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी श्री सत्यनारायण महापूजा, आरती तिर्थप्रसाद, ७ ते ९ स्थानिक भजने, रात्री १० वाजता याक्षिणी दशावतार नाटयमंडळ यांचा पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देवी सातेरी देवालय विश्वस्त मंडळ व बिळवस ग्रामस्थ यांनी केले आहे.
सातेरी जलमंदिरात कलश वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम
