मळगाव इंग्लिश स्कूलच्या १९८७-८८ दहावीच्या बॅचचा रविवारी स्नेहमेळावा…

सावंतवाडी : मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवच्या एस. एस. सी. चॅम्पियन्स गृप १९८७-८८ मधील विद्यार्थी-विद्यार्थीनींचा व इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी पर्यंतच्या सह विद्यार्थी-विद्यार्थीनी गृपचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. एस. एस. सी. नंतर शिक्षण व नोकरी- व्यवसाय यानिमित्त एकमेकांपासून दूर गेलेले हे विद्यार्थी व विद्यार्थीनी तब्बल ३२ वर्षानंतर या स्नेह मेळाव्यात एकत्र येणार आहेत.

रविवार दिनांक ८ मे २०२२ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० यावेळेत ‘जस्ट फाॅर यु रिसाॅर्ट’ या सोनुर्ली पोट्टे कुंभेवाडी येथील निसर्गरम्य व कृषी पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदू तारी यांच्या आलिशान रिसाॅर्ट वर हा मेळावा ५० हून विद्यार्थी वर्ग मित्र व १५ हून अधिक विद्यार्थीनी वर्ग मैत्रिणी यांचा प्रत्यक्ष सहभाग असणार आहे.तर काही अपरिहार्य कारणांमुळे जसे शारीरिक आजार,कौटुंबिक अडचणी,वैयक्तिक अडचणी,मुलांच्या अडचणी, त्यांचे उच्च शिक्षण, विवाह कार्य, नोकरी मध्ये सुट्टी न मिळणे, रेल्वे बुकिंग न मिळणे आदी कारणांमुळे १५ विद्यार्थी वर्ग मित्र व विद्यार्थीनी वर्ग मैत्रिणी स्नेह मेळाव्यात येऊ शकणार नसल्याने त्यांना व्हिडिओ काॅन्फरसींगद्वारे संवाद साधण्यात येणार आहे.

मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव च्या या मळगांव सहीत वेत्ये,नेमळे,निरवडे,सोनुर्ली या पाच गावांप्रमाणेच तळवडे, मळेवाड या दूरवरील गावांमधील विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सहभाग असलेला हा मेळावा नियोजनबद्ध कार्यक्रम व स्नेह भोजनाच्या नियोजनबद्ध संयोजनाद्वारे होणार आहे.या स्नेह मेळाव्यात होणार असलेले कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत. यामध्ये शाळेत म्हटले जाणारे ईशस्तवन व स्वागतगीत राजश्री वासुदेव राऊळ (उर्फ सौ. अश्विनी मनोहर जाधव),बाया नागेश राऊळ(सौ.छाया गजेंद्र गावडे) व इतर विद्यार्थीनी यांच्याकडून सादर होणार आहे.यासाठी हार्मोनियम साथ वर्गमित्र राघोबा रामचंद्र राऊळ व तबला साथ गणपत राऊळ हे देणार आहेत. यानंतर देवी सरस्वती माता तसेच छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे,दिपप्रज्वलन करणे आदी कार्यक्रम होणार आहेत.

या स्नेह मेळावा कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुर्यकांत अनंत सांगेलकर हे करणार आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन समीर रमाकांत परब हे करणार आहेत.तसेच सर्व उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थीनींकडून आपला परिचय व मनोगत व्यक्त करण्याचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १.३० ते २.३० वाजता जेवण,विश्रांती,फेरफटका व गप्पा गोष्टी असे कार्यक्रम होणार आहेत.

यानंतर दुपारी २.३० ते ४.०० यावेळेत विविध गुणदर्शनपर कार्यक्रम होणार आहेत.यामध्ये भजनीबुवा राघोबा रामचंद्र राऊळ,भजनी बुवा राजश्री वासुदेव राऊळ,गुंडू वसंत पाटकर,श्यामसुंदर मनोहर मेस्त्री यांची सुश्राव्य भजन,आॅर्केष्टा गायक गणपत बाबाजी राऊळ यांच्या तर्फे हिंदी-मराठी चित्रपट गीते,अंभग व भावगीत सादरीकरण तर कवी-वात्रटिकाकार तथा पत्रकार सुखदेव गजानन राऊळ यांच्यामार्फत काव्य व वात्रटिका सादरीकरण होईल.उदय दत्ताराम गाड यांच्या मार्फत दशावतार कला सादरीकरण होईल.तसेच गृप मधील अन्य दडलेले कलाकार यांच्या कला सादर होतील.

यानंतर सायंकाळी ४.०० ते ४.३० फनी गेम्स व सायंकाळी ४.३० ते ५.०० या वेळेत प्रमुख मनोगते व मार्गदर्शनपर विचार प्रदर्शन होईल. यामध्ये राखी विठ्ठल नाईक ( उर्फ सौ. संजना संजीव राणे, हरी सिताराम वारंग,शंकर नामदेव राऊळ,प्रशांत विनायक राऊळ,महेंद्र मनोहर कोरगावकर, केशव सखाराम पेडणेकर,दिलीप सोनू राऊळ व उदय वासुदेव नेमळेकर आदींचे विचार प्रदर्शन होईल.यावेळी या गृपशी निगडीत जे १३ विद्यार्थी-विद्यार्थीनी मयत झाले आहेत त्या दिवंगत(कैलासवासी) मित्र-मैत्रिणींना तसेच दिवंगत (कैलासवासी) शिक्षक,शिक्षकेतर श्रद्धांजली वाहण्यात येणार दरम्यान ज्या काही विद्यार्थी-विद्यार्थीनींचे संपर्क क्रमांक अद्याप मिळालेले नाहीत,त्यांच्या आठवणी अन्य मित्र-मैत्रिणींद्वारे काढल्या जाणार आहेत.

तसेच ज्या ज्या माजी शिक्षक व शिक्षिका यांनी शिक्षादान केले त्या सर्व माजी शिक्षक-शिक्षिका यांच्या सहित शिक्षकेतर कर्मचारी यांच्या काही आठवणी व्यक्त करण्याबरोबरच एस. एस. सी चॅम्पियन्स गृप १९८७-८८ या वाॅटसअप गृपची स्थापना,जडणघडण व क्रियाशीलता ठेवण्यासाठी ज्यां ज्या सह विद्यार्थी-विद्यार्थीनी तथा वर्ग मित्र-मैत्रिणी यांनी सहकार्य केले त्यांचे तसेच या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन-संयोजन केले त्या प्रत्येक वर्ग मित्र-मैत्रिणींचे आभार प्रदर्शन व स्नेह मेळाव्याचा समारोप गृप अॅडमिन सुखदेव गजानन राऊळ हे करणार आहेत. मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवच्या एस. एस. सी. चॅम्पियन्स गृप १९८७-८८ चा अर्थात इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी प

You cannot copy content of this page