*⚡बांदा ता.०६-:* स्वातंत्र्यपूर्व काळात १९२२ मध्ये स्थापना झालेल्या सावंतवाडी तालुक्यातील कास नं.१ शाळेचा शतक महोत्सवाचा सांगता समारोहाचा कार्यक्रम शनिवार दि. ७ मे व रविवार दि .८मे रोजी दोन दिवसात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. ७ मे रोजी सभामंडप उद्घाटन, स्मरणिका प्रकाशन, विद्यार्थ्यांचा गुणगौरव, शैक्षणिक साहित्य प्रदर्शन तसेच या दिवशी दुपारी स्नेहभोजन व संध्याकाळी ६ वाजता संगीत संध्या रजनी, ७ वाजता देणगीदारांचा सत्कार व रात्री शालेय विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम तर माजी विद्यार्थ्यांचा “शापित गंधर्व” हा दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे . ८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता शतक महोत्सवाची सांगता १०० फुगे उडवून करण्यात करण्यात येणार.
यावेळी देणगीदारांचा सत्कार करण्यात येणार असून रात्री माजी विद्यार्थी व पालक यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम व त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांचे भिमाशंकर महात्म्य हे दशावतारी नाटक सादरीकरण होणार आहे. या महोत्सवात इतिहासकालीन नाणी व नोटा यांचे प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार आहे. या महोत्सवात सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याध्यापक शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक -शिक्षक संघ, माता-पालक संघ शतक महोत्सव समिती व उपसमिती व कास ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
