आरवली- सोन्सुरे येथे रक्तदान शिबिराला प्रतिसाद

मनसेचे आयोजन

वेंगुर्ल ता.०६-:* जिल्हा परिषद पूर्ण शाळा आरवली- सोन्सुरे (ता.वेंगुर्ला) येथे मनसेना व सिंधूरक्त मित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मनसे वेंगुर्ला तालुका सचिव राजाराम उर्फ आबा चिपकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

शिबिराचे उदघाटन गोरेगाव मुंबई मनसे शाखा अध्यक्षा श्रीम.उर्मिला नाईक यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. श्री गणेशाला आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मनसे तालुका सचिव आबा चिपकर, सोन्सुरा गावचे सरपंच श्री तातोबा कुडव , सावंतवाडी मनसे शहराध्यक्ष श्री आशिष सुभेदार सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठांन,सिंधुदुर्ग शाखा वेंगुर्ला पदाधिकारी व जिल्हा उपाध्यक्ष श्री महेश राऊळ, राजन रेडकर, पै साहेब , चेतन चव्हाण राहाणासाहेब तालुका सहखजिनदार श्री भूषण मांजरेकर ,सदस्य श्री सनी रेडकर,सावंतवाडी रक्तपेढीचे डॉ. आकाश हेडगे, डॉ. अनिल खाडे, डॉ. मानसी बागेवाडी मॅडम, उपस्थित होते,यावेळी नवनिर्माण सेना कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सावंतवाडी ब्लड बँकेचे श्री प्रकाश सातार्डेकर आणि त्यांचे सहकारी यांचे उत्तम सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी होण्यासाठी मनसे तालुकासचिव आबा चिपकर,सावंतवाडी मनसे शहराध्यक्ष श्री आशिष सुभेदार, आनंद आमरे, ओंकार चिपकर, श्रेयस केरकर,आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

You cannot copy content of this page