बेकायदेशीर वाळू वाहतूकीवर कुंभारमाठ येथे महसूल विभागाची कारवाई…
मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यात होणारी वाढत्या चोरट्या वाळूची वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने पथके निर्माण केली असून काल रविवारी रात्रौ पावणे आठ वाजण्याच्या सुमारास मालवण कुंभारमाठ जरीमरी घाटी येथील रस्त्यावर मालवण महसूल विभागाच्या पथकाने बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणारा डंपर पकडला. उद्या मंगळवारी संबंधित डंपर मालकावर दंडात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे…
